शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :वरचढ ‘ फुलेवाडी ’ ला ‘संध्यामठ ’ चा दे धक्का, के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धा ; जादा वेळेत सतीश अहीरचे दोन विजयी गोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 19:32 IST

के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी सामन्याच्या जादा वेळेत मिळालेल्या तीन मिनिटात संध्यामठ तरुण मंडळाच्या सतीश अहीर ने सलग दोन गोल करीत बलाढय फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर २-१ ने मात करीत जोरदार धक्का दिला.

ठळक मुद्देके.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धा वरचढ ‘ फुलेवाडी ’ ला ‘संध्यामठ ’ चा दे धक्काजादा वेळेत सतीश अहीरचे दोन विजयी गोल

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी सामन्याच्या जादा वेळेत मिळालेल्या तीन मिनिटात संध्यामठ तरुण मंडळाच्या सतीश अहीर ने सलग दोन गोल करीत बलाढय फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर २-१ ने मात करीत जोरदार धक्का दिला.शाहू स्टेडियमवर झालेल्या या सामन्यांत पुर्वार्धात फुलेवाडी कडून रोहीत मंडलिक, सुरज शिंगटे, शुभम साळोखे, सिद्धेश यादव, संकेत साळोखे यांनी उत्कृष्ट खेळी व वेगवान चाली करीत संध्यामठ वर वर्चस्व निर्माण केले होते. १६ व्या मिनिटाला फुलेवाडीच्या संकेत साळोखेने मिळालेल्या संधीवर गोल करीत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली.

या गोलनंतर ‘संध्यामठ ’ कडून सामन्यांत बरोबरी साधण्याचे आटोकाट प्रयत्न झाले. संध्यामठकडून सतीश अहीर, अक्षय पाटील, शाहु भोईटे, आशिष पाटील, सिद्धार्थ कऱ्हाडे, यांनी वेगवान चाली रचल्या. मात्र, त्यांना पुर्वार्धाच्या शेवटपर्यंत यश आले नाही.

कोल्हापूरातील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यांतील एक अटीतटीचा क्षण. (छाया : नसीर अत्तार)

उत्तरार्धात फुलेवाडी कडून सुरज शिंगटेच्या पासवर केनचौरची गोल करण्याची संधी वाया गेली. त्यानंतर अक्षय मंडलिक, सिद्धेश यादव व संकेत साळोखेच्या पासवर केनचौरची गोल करण्याच्या संधी वाया गेल्या. त्यानंतर फुलेवाडीकडून खेळात ढिलाई आल्याचा फायदा उठवित संध्यामठकडून शाहू भोईटेच्या पासवर सतीश अहीर ची संधी वाया गेली.

यानंतर संध्यामठकडून ओंकार पावसकरने मारलेला फटका गोलपोस्टवरुन गेल्याने त्याचीही सामन्यांत बरोबरी साधण्याची संधी वाया गेली. अजिंक्य गुजरच्या पासवर पुन्हा सतीश अहीरची गोल करण्याची संधी वाया गेली. संध्यामठ कडून सामन्यांत बरोबरी साधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले.

या प्रयत्नास सामना संपण्याच्या शेवटच्या घटकांपर्यंत यश आले नाही. अखेरीस सामना ‘फुलेवाडी ’ संघ जिंकणार असा विचार करुन प्रेक्षकांनीही मैदान सोडण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान चौथ्या पंचांनी चार मिनिटांचा जादा वेळ जाहीर केला. या जादा वेळेत ८१ व्या मिनिटाला संध्यामठच्या अक्षय पाटीलच्या पासवर सतीश अहीरने गोल करीत सामन्यांत १-१ अशी बरोबरी साधली.

त्यानंतरही‘फुलेवाडी’ चे खेळाडू गाफील राहील्याने पुन्हा ८३ व्या मिनिटास संध्यामठ कडून ओंकार मानेच्या पासवर सतीश अहीरने संघाचा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत आपल्या संघास स्पर्धेतील धक्कादायक विजय मिळवून दिला. यासह लीग स्पर्धेत पहील्या विजयाचीही नोंद केली.शुक्रवारचा सामनापाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल