शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कोल्हापूर : ऊसदरासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू, संपतराव पवार-पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:31 IST

ऊस दराच्या बाबतीत फक्त घोषणांचा पाऊस पाडणारं व शेतकऱ्यांना हाताहात फसवणाऱ्या या करंट्या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, ऊसाला विनाकपात एकरकमी ३५०० रुपये दर दिलाच पाहिजे यासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू तसेच भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.

ठळक मुद्दे ऊसदरासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू, संपतराव पवार-पाटील यांचा इशाराशेकापचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; शेतकऱ्याला फसविणाऱ्या सरकारला हद्दपार करा

कोल्हापूर : ऊस दराच्या बाबतीत फक्त घोषणांचा पाऊस पाडणारं व शेतकऱ्यांना हाताहात फसवणाऱ्या या करंट्या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, ऊसाला विनाकपात एकरकमी ३५०० रुपये दर दिलाच पाहिजे यासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू तसेच भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या विवीध प्रश्नासाठी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणां दिल्या. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी केले. शेकाप कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला.

हातात शेकापचे लाल झेंडे, डोक्यावर टोप्या, गळ्यात स्कार्प घेऊन घोषणा देत शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. तेथे मोर्चाचे रुपांतर जाहिर सभेत झाले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, एफआरपी ची रक्कम १४ दिवसात मिळावी, विनाकपात ३५०० रुपये दर ऊसाला मिळावा, गोकुळ मल्टीस्टेट करण्यास शासनाने परवानगी देऊ नये आदी घोषणांचा उहापोह अनेक नेत्यांनी आपल्या भाषणातून केला.

यावेळी अनेक नेत्यांची भाषणे झाली. शिष्ठमंडळाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंद यांना शिष्ठमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रा. टी. एस. पाटील, दत्तात्रय पाटील, बाबुराव कदम, अशोकराव पवार, अंबाजी पाटील, वसंत कांबळे, संतराम पाटील, शामराव मुळीक, सुभाष सावंत, चंद्रकांत बागडी, बाबासाहेब देवकर, सरदार पाटील, एकनाथ पाटील, सुशांत बोरगे, भिमराव कदम यांच्यासह उज्वला कदम, मिनाक्षी पाटील, वैशाली खाडे, पूजा पाटील, पदमा पाटील, जिजाबाई सुतार आदींचा सहभाग होता.

शेतकरी महिलेच्या वेशभूषाडोक्यावर बुट्टी घेऊन महिला महिला शेतकरी वेशभूषेत मोर्चात सहभागी झालेल्या मुलींनी साºयांचे लक्ष वेधले. तर मोर्चाच्या अग्रभागी बैलगाडीत निर्धार मोर्चाचा फलकही झळकत होता.

मोर्चातील प्रमुख मागण्या..१)शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे२)ऊसाची एफआरपी’ एकरकमी १४ दिवसात मिळावी, ऊसाला प्रतिटन विनाकपात ३५०० रुपये मिळावे३)गोकुळ मल्टीस्टेट करण्यास शासनाने परवानगी देऊ नये.४)स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सर्व शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा५)म्हैस दुधाला प्रतिलिटर ६० रुपये, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्या६)गुळाला प्रति क्विंटल किमान ५००० रुपये भाव द्या७) शेतीमालाची हमीभावाने खरेदी करणारी शासकिय खरेदी केंद्रे बाजारनिहाय सुरु करावीत 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर