शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शॉर्ट मार्जिनची रक्कम अनुदान म्हणून द्या, कॉँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 18:32 IST

साखरेचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले असून, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि ‘एफआरपी’मधील तफावत सरकारने अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

ठळक मुद्देशॉर्ट मार्जिनची रक्कम अनुदान म्हणून द्याकॉँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : साखरेचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले असून, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि ‘एफआरपी’मधील तफावत सरकारने अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.कॉँग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले. साखरेचे घसरलेले दर, शेतकऱ्यांची थकलेली उसाची बिले आणि साखरेचा शिल्लक साठा यांमुळे साखर उद्योग कमालीचा अडचणीत आला आहे.

अशा परिस्थितीत सरकारने बघ्याची भूमिका न घेता ठोस निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे सांगत संजय पाटील म्हणाले, साखर कारखानदारीच्या इतिहासात कधी नव्हे इतकी अस्थिर परिस्थिती यंदा निर्माण झाली असून, याला सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे.

साखरेला मागणी आणि दरही नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे कसे? असा पेच कारखानदारांसमोर असून, अशा वेळी सरकारने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. साखरेच्या मूल्यांकनानुसार बॅँकांकडून मिळणारी उचल आणि ‘एफआरपी’ यांमध्ये मोठी तफावत आहे. या तफावतीची रक्कम सरकारने अनुदान म्हणून दिली तरच पुढील हंगाम सुरू होऊ शकतो.

साखर कारखानदारांमधून राज्य व केंद्र सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळतो. हा उद्योग अडचणीत असतानाही केवळ बघ्याचीच भूमिका घेणार असाल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देत साखरेला किमान ४० रुपये हमीभाव द्या, पुढील दोन वर्षांचे सर्व कर माफ करा, जीवनाश्यक वस्तूंच्या यादीतून साखर वगळा, बफर स्टॉक करावा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी संपत भोसले, रवी वराळे, तानाजी मोरे, गजानन हवालदार, प्रदीप पाटील, योगेश हत्तलगे, जयसिंग पाटील, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर