ठळक मुद्दे० निदर्शनासाठी जिल्हाभरातून कॉँग्रेसचे पदाधिकारी दाखल. ० विद्यमान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. ० भाजपा सरकारची सत्ता घालविण्यासाठी एकजूट व्हा, चे आवाहन कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी केले.


धुळे  :  नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष बुधवारी पूर्ण होत आहे. या निर्णयाच्या विरोधात   धुळे कॉँग्रेस कमिटीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांमुळे येथील परिसर दणाणून सोडला. 
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे उद्योग अडचणीत आले आहे. २५ लाख लोकांच्या नोकºयाही गेल्या. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून उद्योगांवरही संक्रांत आली. त्याविरोधात कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी संताप व्यक्त करीत आंदोलन केले. 
यावेळी जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, कॉँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, आमदार कुणाल पाटील, जि.प.  अध्यक्ष शिवाजी दहिते, जि.प.चे समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, किशोर पाटील, 
डॉ. दरबारसिंग गिरासे, साबीर शेख, प्रभाकर चव्हाण, इस्माईल खान पठाण, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अलोक रघुवंशी,  प्रभा परदेशी, विमल बेडसे, नाजनीन शेख, गायत्री जयस्वाल, बानु शिरसाठ उपस्थित होते. 

भारिप बहुजन महासंघातर्फे लुटारूंचा दिवस 
भारिप बहुजन महासंघातर्फे बुधवारी नोटाबंदीच्या विरोधात ‘लुटारूंचा दिवस’ पाळण्यात आला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी प्रा.  बाबा हातेकर, भैय्यासाहेब पारेराव, मिलिंद वाघ, आकाश बागुल, आनंद वानखेडे, योगेश जगताप, योगेश बेडसे, सागर मोहिते, नीलेश अहिरे, राकेश खैरनार आदी उपस्थित होते.