मुलींत कोल्हापूरची बाजी
By Admin | Updated: November 25, 2015 00:53 IST2015-11-25T00:52:13+5:302015-11-25T00:53:53+5:30
शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा : मुलांमध्ये पुण्याची आघाडी

मुलींत कोल्हापूरची बाजी
कुरुंदवाड : क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे विभागीय उपसंचालक कोल्हापूर विभाग, दत्त कनिष्ठ महाविद्यालय व हर्क्युलस जिम्नॅशियम कुरुंदवाड यांच्या विद्यमाने येथे राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला प्रारंभ झाला.
या स्पर्धेत स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, लातूर, नाशिक व क्रीडा प्रबोधिनीच्या २४० मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. यावेळी राष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या कदम हिने खेळाडूंना शपथ दिली.
मंगळवारी दिवसभर १७ वर्षांखालील झालेल्या पहिल्या चार मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने बाजी मारली.
तत्पूर्वी, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यांनी शाळांमध्ये वेटलिफ्टिंगचे साहित्य पुरवण्याची गरज प्रतिपादन केली.
यावेळी क्रीडा उपसंचालक एन. बी. मोठे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी पाटील, गौतम पाटील, हर्क्युलस जीमचे प्रदीप पाटील, क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, अभिजित पाटील, जवाहर पाटील, आदी उपस्थित होते.