शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी मृत्युमुखी, शाहुवाडी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 17:17 IST

Kolhapur News: शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी पैकी केदारलिंगवाडीच्या हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी ठार झाली. मनीषा बाबाजी डोईफोडे (वय १०, सध्या. रा. केदारलिंगवाडी, मूळ रा. पुसाळे, ता. शाहूवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे.

- मारुती गुरवकोल्हापूर - शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी पैकी केदारलिंगवाडीच्या हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी ठार झाली. मनीषा बाबाजी डोईफोडे (वय १०, सध्या. रा. केदारलिंगवाडी, मूळ रा. पुसाळे, ता. शाहूवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. २१) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

शाहूवाडी तालुक्यातील पुसाळे येथील बाबाजी डोईफोडे हे गेल्या चार महिन्यांपासून कुटुंबासह उदगिरी पैकी केदारलिंगवाडी येथे राहत आहेत. त्यांची पत्नी आणि मुलगी बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जनावरांना चरण्यासाठी घेऊन निघाल्या होत्या. केदारलिंग वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर जनावरांच्या मागे असलेल्या मनीषा डोईफोडे या मुलीला बिबट्याने झडप मारून पकडले. काही अंतर पुढे गेल्यावर मुलीचा आवाज येत नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. आईने मुलीचा शोध सुरू केल्यानंतर काही अंतर मागे गवतात मुलीला ओढून नेणारा बिबट्या दिसला. आरडाओरडा करताच बिबट्या जंगलात पळून गेला.

माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याने मान पकडल्यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला. या  परिसरात बिबट्यांची दहशत वाढली असून, त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. चांदोली अभयारण्यापासून जवळच हा परिसर असल्यामुळे बिबट्यांचा वावर वाढला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या