शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अधिकाधिक शाळा तंबाखूमुक्त करा : शौमिका महाडिक, जनजागृती कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:16 IST

कोणतेही व्यसन सोडण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मनोनिग्रह महत्त्वाचा असतो. तो टिकविण्यासाठी इतरांचे सहकार्यही अपेक्षित असते. याविषयी जनजागरण करीत जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा, आरोग्य संस्था तंबाखूमुक्त कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

ठळक मुद्देअधिकाधिक शाळा तंबाखूमुक्त करा : शौमिका महाडिकराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृती कार्यशाळा

कोल्हापूर : कोणतेही व्यसन सोडण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मनोनिग्रह महत्त्वाचा असतो. तो टिकविण्यासाठी इतरांचे सहकार्यही अपेक्षित असते. याविषयी जनजागरण करीत जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा, आरोग्य संस्था तंबाखूमुक्त कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सिगारेट व अन्य तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा) २००३ ची अंमलबजावणी व जनजागृती कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहामध्ये पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला आणि बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील, सभापती मंगल कांबळे उपस्थित होत्या.शौमिका महाडिक म्हणाल्या, सक्रिय व निष्क्रिय धूम्रपानाविषयी माहिती देऊन निष्क्रिय धूम्रपानाचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबतही जनजागरण आवश्यक आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सर्व विभागांना ‘कोटपा कायदा २००३’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. डॉ. सुरेश घोलप यांनी ‘तंबाखूसेवनाचे मानवी शरीरावरील दुष्परिणाम’ याबाबत माहिती दिली.

कार्यशाळेला अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. यु. जी. कुंभार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई, जिल्हा परिषद विभागप्रमुख, तालुका गटविकास अधिकारी, आरोग्य समिती सदस्य, पान शॉप असोसिएशन, पोलीस विभाग, हॉटेल ओनर, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, बार असोसिएशन कोल्हापूर, महसूल विभाग, स्वयंसेवी संस्था (एन. जी. ओ.), राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पदाधिकारी, जिल्हा राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर