शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

कोल्हापुरनेच दिला कॅमेराचा पहिला अनुभव आणि पुरस्कारही- सचिन पिळगांवकर

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 1, 2023 21:00 IST

सचिन पिळगांवकर यांचा नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर: मी तीन वर्षाचा असताना पहिल्यांदा कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी आलो. कॅमेरा, सेट पाहून रडायला लागलो आणि रिजेक्ट झालो. त्यानंतर एकदीड वर्षानी याच स्टुडिओत हा माझा मार्ग एकला चित्रपटात बालकलाकाराची भुमिका केली आणि यासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला..रिजेक्शन आणि सिलेक्शन हे दोन्ही पहिले वहिले अनुभव मला कोल्हापुरने दिले. म्हणून कोल्हापूरशी माझे धागे जुळले आहेत..अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी भावना व्यक्त केल्या. निमित्त होते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्काराचे.

शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमात राजदर्शन दानवे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यानंतर सचिन पिळगांवकर यांनी आपला ६० वर्षांचा हिंदी-मराठी सिनेसृष्टीचा प्रवास उलगडला.सचिन पिळगावकर म्हणाले, सुर्यकांत मांडरे यांनी मला पहिल्यांदा पाहिले, त्यानंतर माझा सिनेसृष्टीचा प्रवास सुरू झाला. जयशंकर दानवे यांच्या अभिनयाची मी नक्कल करायचो. गुरुदत्त यांना मी गुरूस्थानी मानतो तर मीनाकुमारी यांच्यामुळे मी उर्दु शिकलो. अस्खलित उर्दू बोलू शकत असल्याने कट्यार काळजात घुसली मधील खाँसाहेब मी वठवू शकलो.

टॅग्स :Sachin Pilgaonkarसचिन पिळगांवकरkolhapurकोल्हापूर