शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Kolhapur: गारगोटी-कोल्हापूर महामार्ग अखेर सर्व वाहनांना बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 21:24 IST

Kolhapur Flood News: वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी गारगोटी कोल्हापूर महामार्गावरून वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

 - शिवाजी सावंतगारगोटी - वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी गारगोटी कोल्हापूर महामार्गावरून वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भुदरगड तालुक्यात जनजीवन विस्कळित झाले आहे.गेले सहा दिवस पूरस्थिती निर्माण झाली आहे परंतु गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस पडल्याने वेदगंगा नदीला महापूर आला आहे.गारगोटी कोल्हापूर महामार्गावर मडीलगे बुद्रुक येथे दुपारपासून महापुराचे पाणी रस्त्यावरून पलीकडे वाहू लागले होते.संध्याकाळी पाण्याची पातळी सतत वाढू लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला आहे.प्रांताधिकारी वसुंधरा बारवे,तहसिलदार डॉ.अर्चना पाटील,पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

तालुक्यात गेल्या चोवीस तासांत ७७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उमळून पडले आहेत.तालुक्यातील पाटगाव धरण ९१.१८ टक्के भरले असून विद्युत निर्मितीसाठी ३०० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.या ठिकाणी गेल्या चोवीस तासांत १२५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. चिकोत्रा मध्यम प्रकल्प ६६.२० टक्के भरला आहे.या परिसरात १९४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.याशिवाय फये, वासनोली,कोंडूशी,नागणवाडी हे लघु प्रकल्प तुडूंब भरले आहेत.या छोट्या धरणांच्या सांडव्यातुन पाणी वाहत आहे.ओढेनाले दुथडी भरून वाहत आहेत. धुंवाधार पावसामुळे नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे.नदीकाठच्या घरात राहणाऱ्या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.   वाहनचालकांना कोल्हापूर वरून गारगोटी येथे येण्यासाठी कुर येथून म्हसवे मार्गे जाता येईल.अथवा याच मार्गावरील दारवाड मार्गे मिणचे येथून आकुर्डे मार्गे कडगाव कडे जाता येईल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूर