शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  फळ-भाज्या, धान्याचे दर भडकणार, मालवाहतूक संपाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 18:10 IST

देशव्यापी मालवाहतूक चक्काजाम आंंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने फळ-भाजीपाला, धान्य आवक थंडावली असून येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देफळ-भाज्या, धान्याचे दर भडकणार, मालवाहतूक संपाचा परिणाम आवक घटली; डिझेल विक्रीत २५ टक्के घट; दैनंदिन जीवनावर परिणाम

कोल्हापूर : देशव्यापी मालवाहतूक चक्काजाम आंंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने फळ-भाजीपाला, धान्य आवक थंडावली असून येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषत: कांदा बटाट्याचे दर भडकण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल चा मुबलक साठा असला तरी मालवाहतूक संपामुळे डिझेलची विक्री सुमारे २५ टक्के घटली आहे.आॅल इंडिया मोटर्स ट्रॉन्स्पोर्ट काँग्रेस नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी गेले चार दिवस संप सुरू असल्याने मालवाहतुकीची चाके रस्त्याकडेला थांबली आहेत. या संपाचा दैनंदिन जीवनावर हळूहळू परिणाम जाणवू लागला आहे. मालवाहतुकीच्या संपामुळे कोल्हापूरच्या बाजारपेठेत मालाची आवक-जावक पूर्णपणे थंडावली आहे; त्यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी शुकशुकाट जाणवत होता.

कांदा-बटाट्याची आवक ८० टक्के घटली, दर स्थिरकोल्हापूरच्या बाजारपेठेत अहमदनगर, सोलापूर, पुणे या ठिकाणाहून मालवाहतुकीने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. रोज किमान ४५ ते ५० ट्रक कांद्याची आवक होते; पण दिवसभरात फक्त १० ट्रकच कांद्याचे आल्याने सुमारे ८० टक्के कांदा वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे. याशिवाय कांद्याच्या प्रमाणात बटाट्याचीही आवक आग्रा, इंदोरच्या बाजारपेठेतून कोल्हापुरात होते; पण या आवकेवरही सुमारे ७५ टक्के परिणाम झाला आहे.

हा संप अगोदरच जाहीर केला असल्याने व्यापाऱ्यांनी कांद्याचा साठा करून ठेवल्याने आवक घटली असली तरी कोल्हापुरात कांदा उपलब्ध होऊ लागल्याने अद्यापतरी दरावर कोणताही परिणाम झाला नसून दर स्थिर आहेत.

मालवाहतूकदारांच्या संपामुळे बाजार समितीतील आवक-जावकवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून भाजीपाल्याची रोजची सुमारे ६० टक्के तर फळांची ८० टक्के आवक घटली आहे.- मोहन सालपे,सचिव, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती.

 

मालवाहतूकदारांच्या संपामुळे ट्रकसारखी डिझेलवर धावणारी वाहने रस्त्याकडेला थांबल्याने पंपावर डिझेलचा मुबलक साठा असूनही तो अपेक्षेप्रमाणे उचल होत नाही. या डिझेल विक्रीवर सुमारे २५ टक्के परिणाम झाला आहे.- गजकुमार माणगावे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशन. 

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामTrafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर