राष्ट्रीय माउंटन बाईक सायकलिंग स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या चौघींची निवड
By Admin | Updated: October 29, 2015 00:29 IST2015-10-29T00:26:37+5:302015-10-29T00:29:14+5:30
राज्य जलतरण स्पर्धेत कारवी गायकवाडचे यश

राष्ट्रीय माउंटन बाईक सायकलिंग स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या चौघींची निवड
कोल्हापूर : अहमदनगर येथे झालेल्या राज्य एमटीबी सायकल स्पर्धेत कोल्हापूरच्या सलोनी आंग्रे, स्वप्नाली सुतार, शिवानी वाघमोडे, मानसी कल्याणकर यांनी चमकदार कामगिरी केली. या कामगिरीवर चौघींची निवड क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे होणाऱ्या १२ व्या राष्ट्रीय एमटीबी (माउंटन बाईक) स्पर्धेसाठी निवड झाली. या चौघींना प्रशिक्षक विश्वजित सुतार, दीपक गुमाने यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी विजय जाधव यांची तांत्रिक अधिकारी व राजू रोकडे, काशीनाथ वाघमोडे, सरदार आंग्रे, डॉ. चंद्रकांत चव्हाण यांची पंचपदी निवड झाली आहे.
राज्य जलतरण स्पर्धेत कारवी गायकवाडचे यश
कोल्हापूर : औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कारवी गायकवाड हिने चमकदार कामगिरी केली. तिला संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थाध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे, क्रीडाशिक्षक एल. बी. अंगज, एस. जे. मगदूम, जलतरण कोच बालाजी केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.