शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींत विश्वचषकाची धून! काऊंटडाऊन सुरू : कमालीची उत्कंठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:45 IST

अवघ्या सोळा दिवसांवर येऊन ठेपलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘किक आॅफ’ची उत्कंठा करवीरकरांनाही लागून राहिली आहे. अनेक फुटबॉल चाहत्यांकडून सोशल मीडियावरून

ठळक मुद्देसोशल मीडियावर स्टार खेळाडूंची रेलचेल

कोल्हापूर : अवघ्या सोळा दिवसांवर येऊन ठेपलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘किक आॅफ’ची उत्कंठा करवीरकरांनाही लागून राहिली आहे. अनेक फुटबॉल चाहत्यांकडून सोशल मीडियावरून ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल), लिओनल मेस्सी (अर्जेंटिना), ज्युनिअर नेम्मार (ब्राझील), ओलिवर (फ्रान्स) आदी फुटबॉल खेळाडूंचा खेळाच्या चित्रफिती फिरू लागल्या आहेत.

कोल्हापुरातही गेल्या चार महिन्यांत के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धा, अटल चषक, महापौर चषक, राजेश चषक, सतेज चषक या फुटबॉल स्पर्धा झाल्या आहेत, तर आता ‘फुटबॉल महासंग्राम’च्या रूपाने १० जूनपर्यंत फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. यातही चाहत्यांसह खेळाडूंनाही बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर टिकून राहावा म्हणून संयोजकांकडून स्त्री व पुरुष क्रीडारसिकांना चक्क दुचाकी बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय शाहू स्टेडियममधील भल्या मोठ्या फुटबॉलची प्रतिकृती , विख्यात फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फायबरमधील ७ फूट उंचीचा पुतळा आकर्षण ठरला आहे. ‘हासंग्राम’मध्येही फुटबॉलची क्रेझ आणखी वाढावी म्हणून संयोजकांनी जगप्रसिद्ध नाईकी या कंपनीचे दहा फुटबॉल जर्मनीहून मागविले आहेत. त्यांचाही वापर या स्पर्धेसाठी होते आहे.या सामन्याकडे करवीरकरांचे लक्ष१५ जून - पोर्तुगाल विरुद्ध स्पेन, १६ जून - फ्रान्स विरुद्ध आॅस्ट्रेलिया, अर्जेंटिना विरुद्ध आयर्लंड, पेरू विरुद्ध डेन्मार्क, १७ जून - जर्मनी विरुद्ध मेक्सिको, ब्राझील विरुद्ध स्वीत्झर्लंड, १८ जून - बेल्जियम विरुद्ध पनामा, १९ जून - कोलंबिया विरुद्ध जपान, २० जून - पोर्तुगाल विरुद्ध मोरक्को, २१ जून - इराण विरुद्ध स्पेन, डेन्मार्क विरुद्ध आॅस्ट्रेलिया, फ्रान्स विरुद्ध पेरू, २३ जून - जर्मनी विरुद्ध स्वीत्झर्लंड, २४ जून - इंग्लंड विरुद्ध पनामा.

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर