शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : व्हीलचेअर मॅरॅथॉनमध्ये पन्हाळ्याचा दुचाकी मॅकेनिक संतोष रांजगणे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:52 IST

पन्हाळा तालुक्यातील राक्षी गावचे सुपुत्र जन्मापासून दोन्ही पायाने दीव्यांग असलेले संतोष रांजगणे यांनी चेन्नई येथे झालेल्या कोटक व्हीलचेअर मॅरॅथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळवून पन्हाळ्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकावला आहे. २ तास १३ मिनिटे २१ सेकंदात रांजगणे यांनी हे २१ किलोमीटरचे अंतर व्हीलचेअर वरून पार केले आहे.

ठळक मुद्दे व्हीलचेअर मॅरॅथॉनमध्ये संतोष रांजगणे प्रथमपन्हाळ्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर

पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील राक्षी गावचे सुपुत्र जन्मापासून दोन्ही पायाने दीव्यांग असलेले संतोष रांजगणे यांनी चेन्नई येथे झालेल्या कोटक व्हीलचेअर मॅरॅथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळवून पन्हाळ्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकावला आहे. २ तास १३ मिनिटे २१ सेकंदात रांजगणे यांनी हे २१ किलोमीटरचे अंतर व्हीलचेअर वरून पार केले आहे.

जन्मापासून दोन्ही पाय निकामी असलेले रांजगणे नियतीशी झगडत आपला दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय वाघबीळजवळ दानेवाडी येथे करतात. गेल्या एक वर्षापासून ते दीव्यांगांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात.

त्याचाच भाग म्हणून त्यांनी चेन्नई येथे दर वर्षी होणा-या कोटक व्हीलचेअर मॅरॅथॉन मध्ये भाग घ्यायचे ठरवले. दिव्यांग असले तरी लहानपणापासून कष्टाच्या कामाची सवय असल्याने या स्पर्धेत रांजगणे यांनी कमीत कमी वेळात हे २१ किलोमीटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळवला.

नेपाळचे रामबहादूर तमन यांनी ही मॅरॅथॉन २ तास १६ मिनिटे आणि ५४ सेकंदात पूर्ण करून दूसरा क्रमांक तर राजीव कुमार यांनी ही २ तास ३८ मिनिटात पूर्ण करून तिसरा क्रमांक मिळवला.या मॅरॅथॉन मध्ये देशभरातून ३०० स्पर्धकांनी भाग घेतला होता.संतोष रांजगणे व्हीलचेअर क्रिकेटमध्येही खेळत असून त्यांचा महाराष्ट्राच्या संघात समावेश आहे. कोल्हापूरचे कमलेश कराळे आणि अनिल पवार हे ही महाराष्ट्राच्या संघात आहेत. नुकत्याच झालेल्या इंडियन व्हीलचेअर प्रिमियर लिग या स्पर्धेत संतोष यांना मॅन अॉफ द मॅच आणि बेस्ट बॉलर अॉफ द सिरीज म्हणून घोषित करण्यात आले.या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जाण्या येण्याचा खर्च संतोष दुचाकी मॅकेनिक म्हणून काम करुन आलेल्या पैशातून करतात. शिवाय त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारीही आहे.

टॅग्स :Marathonमॅरेथॉनkolhapurकोल्हापूर