शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :आगीचा बंब दुचाकीवर, दुचाकी मेकॅनिक संदीप गायकवाडची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:15 IST

अचानक लागलेल्या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी कोल्हापुरातील संदीप गायकवाड या दुचाकी मेकॅनिकने सुपर बाईक अर्थात आगीचा बंब दुचाकीवर तयार केला आहे. त्याने अग्निशमन करणारी सर्व यंत्रणा या दुचाकीवर बसविली आहे. त्याच्या या किमयेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

ठळक मुद्देआगीचा बंब दुचाकीवरदुचाकी मेकॅनिक संदीप गायकवाडची किमया‘जीपीआरएस’सह सर्व उपकरणांनी सज्ज

सचिन भोसले 

कोल्हापूर : अचानक लागलेल्या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी कोल्हापुरातील संदीप गायकवाड या दुचाकी मेकॅनिकने सुपर बाईक अर्थात आगीचा बंब दुचाकीवर तयार केला आहे. त्याने अग्निशमन करणारी सर्व यंत्रणा या दुचाकीवर बसविली आहे. त्याच्या या किमयेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

सद्य:स्थितीत राज्यात कुठे ना कुठे तरी आग लागल्याचे आपण रोज वृत्तपत्रांतून वाचत असतो व दूरचित्रवाणीवरून त्याचे प्रसारणही पाहतो. अशा आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही आग रौद्ररूप धारण करते. त्यातून वित्त व जीवितहानी मोठ्या प्रमाणात होते.

हे नुकसान टाळण्यासाठी आणि घटनास्थळी जलद गतीने पोहोचण्यासाठी कोल्हापुरातील दुचाकी मेकॅनिक संदीप गायकवाडने एक अफलातून ‘फायर बाईक’ तयार केली आहे. या दुचाकीमध्ये अग्निप्रतिबंधक बंब, मोठे सर्चलाईट, मोबाईलद्वारे नेमक्या स्थळी पोहोचण्यासाठी ‘जीपीआरएस मॅप’ची सोय केली आहे.

जखमींवर प्राथमिक औषध उपचारासाठीची औषधांनी युक्त पेटी, अग्नी प्रतिबंधक हेल्मेट, एखाद्या चारचाकीला आग लागल्यानंतर तिचे बॉनेट उघडण्यासाठी विशेष लोखंडी साहित्यही त्याने या बाईकमध्ये ठेवण्याची सोय केली आहे. यासह सायरनची सोयही केली आहे.संदीप हा पाचगाव परिसरात राहतो. तो केवळ दहावी उत्तीर्ण आहे. त्याने दुचाकी दुरुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले असून तो घरपरिसरातच दुचाकी दुरुस्ती करतो. विशेष म्हणजे जोतिबाच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या नादुरुस्त झालेल्या दुचाकी मोफत दुरुस्त करून देण्याचे कामही तो करतो. या विशेष दुचाकीसाठी त्याला सुमारे ३५ हजार इतका खर्च आला आहे.

गर्दीच्या ठिकाणी जेथे चारचाकी पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी ही दुचाकी सहजरीत्या पोहोचते. विशेष म्हणजे केवळ आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नाही तर अपघातात सापडलेल्या चारचाकी वाहनचालकांच्या मदतीसाठीही त्याने या दुचाकीमध्ये साहित्य सुसज्ज ठेवले आहे. त्यामुळे या सुपर फायर बाईक कोल्हापूरकरांचे आकर्षण ठरत आहे.

मागील वर्षी जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेत छोटी आग लागली. अशा छोट्या-मोठ्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी करावे, म्हणून मला ही कल्पना सुचली. त्यातून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय साहित्य लागते याचा अभ्यास केला. याकरिता मला ३५ हजारांहून अधिक खर्च आला.- संदीप गायकवाड, दुचाकी मेकॅनिक 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग