शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :शेतकरी संघ : अपात्रतेनंतर युवराज पाटील यांचा घाईगडबडीने राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 10:52 IST

शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांना जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी गुरुवारी (दि. ३०) अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी घाईगडबडीने संचालकपदाचा राजीनामा सादर केला. भूविकास बॅँकेच्या थकबाकीपोटी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, जिल्हा उपनिबंधकांनी ही दुसऱ्यांदा कारवाई केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघ : अपात्रतेनंतर युवराज पाटील यांचा घाईगडबडीने राजीनामा‘भूविकास बॅँके’च्या थकबाकीपोटी जिल्हा उपनिबंधकांची कारवाई

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांना जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी गुरुवारी (दि. ३०) अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी घाईगडबडीने संचालकपदाचा राजीनामा सादर केला. भूविकास बॅँकेच्या थकबाकीपोटी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, जिल्हा उपनिबंधकांनी ही दुसऱ्यांदा कारवाई केली आहे.‘भूविकास’ बॅँकेचे संचालक म्हणून काम करीत असताना २७ मार्च २०१२ रोजी युवराज पाटील यांनी मुलगा मानसिंग पाटील यांच्या नावावर पाईपलाईन व इलेक्ट्रिक मोटार खरेदीसाठी १५ लाख रुपये कर्जाची उचल केली होती; पण त्यांनी ही रक्कम भरली नसल्याने मार्च २०१७ अखेर २० लाख ८३ हजार रुपये थकबाकी झाली.

या कर्जाला युवराज पाटील सहकर्जदार होते. युवराज पाटील हे शेतकरी संघाचे संचालक म्हणून निवडून आल्यानंतर संघाचे माजी संचालक सुरेश देसाई यांनी पाटील यांच्यासह एम. एम. पाटील व मानसिंग पाटील यांच्याविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. जिल्हा उपनिबंधकांनी संबंधितांना अपात्र ठरविले होते. त्यापैकी मानसिंग पाटील व एम. एम. पाटील यांनी राजीनामा दिला; तर युवराज पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.न्यायालयाने भूविकास बॅँकेची थकीत रक्कम भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाटील यांनी १४ आॅगस्ट २०१७ रोजी २९ लाख ४६ हजार ६५२ रुपये भूविकास बॅँकेकडे पैसे जमा केले. पैसे भरल्याने कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी पाटील यांनी न्यायालयात केली होती; पण याबाबत सहकार विभागाने निर्णय घ्यावेत, असे न्यायालयाने सूचित केले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी पाटील यांना नोटीस काढून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे सुनावणी होऊन गुरुवारी (दि. ३०) पाटील यांना अपात्र ठरवीत यापुढील संचालक मंडळाचा कार्यकाल संपेपर्यंत कालावधीसाठी संचालक मंडळावर पुन्हा निवडून येण्यास, नियुक्ती करता येणार नसल्याचे आदेश दिले. त्यामुळे बुधवारी (दि. २९) संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे पत्र शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केले.

अध्यक्षपदासाठी ‘जी. डी.’, माने यांचे नावयुवराज पाटील यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्याने ‘अध्यक्षपदासाठी कोण?’ याची चर्चा रंगू लागली आहे. अध्यक्षपदावर युवराज पाटील यांचे विश्वासू व राष्ट्रवादी कॉँग्रेस जी. डी. पाटील (पाडळी खुर्द) यांचे नाव आघाडीवर आहे. त्याशिवाय अमरसिंह माने यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

 

गेल्या अनेक वर्षांच्या लढाईला यश आले. निवडणूक पोटनियम दुरुस्तीबाबतही लढाई कायम ठेवली जाईल. एकीकडे ‘गोकुळ’ मल्टीस्टेटला विरोध करणाऱ्या नेत्यांना शेतकरी संघाच्या खासगी करण्याचा घाट दिसत नाही का?- सुरेश देसाई, तक्रारदार

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर