शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मागील बिल मिळाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही: शेतकरी संघटनांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 17:58 IST

गेल्या ऊस हंगामातील अंतिम बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही, ते दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शनिवारी शेतकरी संघटनांच्या समन्वय परिषदेतर्फे देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कारखानदार व सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देमागील उसाचे बिल मिळाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही: शेतकरी संघटनांचा इशाराजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा : साखर कारखानदार, सरकारविरोधात तीव्र निदर्शने

कोल्हापूर : गेल्या ऊस हंगामातील अंतिम बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही, ते दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शनिवारी शेतकरी संघटनांच्या समन्वय परिषदेतर्फे देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कारखानदार व सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.दुपारी एकच्या सुमारास दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या धडक मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये जवळपास तेरा शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेतकरी एकजुटीचा विजय असो, ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, यंदाच्या हंगामात पहिली उचल एकरकमी ३५०० रुपये द्यावी, मागील बिलाची थकबाकी प्रतिटन ४०० रुपये मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत दसरा चौकातून या धडक मोर्चाला सुरुवात झाली. सीपीआर चौक, शिवाजी चौक, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हिनस टॉकीज, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, मागील हंगामातील दोनशे रुपयांचे काय झाले हे पालकमंत्र्यांनी सांगावे. पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी मागील देणी भागविली पाहिजेत, मागील एफआरपी अधिक दोनशे रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, मागील हंगामात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एफआरपी अधिक २०० रुपये असा तोडगा निघाला होता, परंतु कारखान्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. पालकमंत्र्यांनी याची जबाबदारी म्हणून सर्व कारखान्यांना मागील अंतिम बिले देण्यास सांगावे. पालकमंत्र्यांनी एक बैठक घेऊन ऊसदराबाबत अंतिम निर्णय घ्यावा. तसेच १२.५० रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांना ३२५० रुपये अंतिम दर निघत आहे तो देऊनच कारखाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच या हंगामात पहिली उचल एकरकमी ३५०० रुपये द्यावी.आंदोलनात शेतकरी संघटनेचे पी. जी. पाटील, टी. आर. पाटील, अ‍ॅड. माणिक शिंदे, बळिराजा संघटनेचे गणेश जगताप, बी. जी. पाटील, साजीद मुल्ला, अंकुश आंदोलनचे धनाजी चुडमुंगे, जयशिवराय जयकिसान संघटनेचे शिवाजी माने, संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पालकमंत्र्यांच्या घराऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासमन्वय परिषदेतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता; परंतु पालकमंत्री बाहेरगावी असल्याने पोलिसांच्या सूचनेनुसार हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर