शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कोल्हापूर : आरोग्य विभागाच्या दुसऱ्या मजल्याचा लक्षवेधी ‘लुक’ : आदर्शवत उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:04 IST

कोल्हापूर : आरोग्य विभागामुळे जिल्हा परिषदेच्या दुसºया मजल्याचा ‘लुक’ बदलला आहे. विविध योजनांचे लावण्यात आलेले फलक, त्यांवर आकर्षक प्रकाशझोत ...

ठळक मुद्देमाहिती कक्ष, फलकांद्वारे योजनांचे होणार जनजागरण; लवकरच प्रकल्पाचे उद्घाटन पॅसेजमध्येही आरोग्य विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आलेले आहेत

कोल्हापूर : आरोग्य विभागामुळे जिल्हा परिषदेच्या दुसºया मजल्याचा ‘लुक’ बदलला आहे. विविध योजनांचे लावण्यात आलेले फलक, त्यांवर आकर्षक प्रकाशझोत आणि तयार करण्यात आलेल्या माहिती कक्षामुळे हा मजला लक्षवेधी ठरला आहे. लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

गरोदर महिलेपासून ते अत्यवस्थ असणाºया रुग्णांपर्यंत अनेकांना लाभ देण्यासाठी सरकारने विविध आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दुसºया मजल्यावर कार्यरत आहे.

या मजल्यावर गेल्यानंतर समोरच नागरिकांना दृष्टीस पडेल असा एक आकर्षक कक्ष तयार करण्यात आला आहे. स्तनपानाचे महत्त्व, १०८ रुग्णवाहिका, डॉक्टरांचा सल्ला, पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष यांबाबत मार्गदर्शन करणारे फलक आणि संदेश देणाºया महिला, बाळांचे कटआउट्स या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. तसेच येथे आता विविध संदेश फलकही लावण्यात येणार आहे. रंगीत कटआउट्समुळे हा कक्ष अधिकच आकर्षक झाला आहे.

या मजल्यावरील पॅसेजमध्येही आरोग्य विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आलेले आहेत. यावर आकर्षक असे प्रकाशझोत टाकण्यात आले आहेत. अशा प्रभावी पद्धतीने आरोग्य विभागाने संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील,आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी, डॉ. उषादेवी कुंभार, विस्तार अधिकारी एकनाथ जोशी यांनी ही संकल्पना राबविली.कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागाने आकर्षक माहिती कक्ष उभारला आहे. शासकीय योजनांचे आकर्षक फलकही लावण्यात आले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर