शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : काजू फळपीक विकास समितीची स्थापना, ३२ सदस्यांमध्ये जिल्ह्यातील तिघांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:55 IST

काजू पिकाच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘काजू फळपीक विकास समिती’ची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देकाजू फळपीक विकास समितीची स्थापना३२ सदस्यांमध्ये जिल्ह्यातील तिघांचा समावेश

कोल्हापूर : काजू पिकाच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘काजू फळपीक विकास समिती’ची स्थापना केली आहे.कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काजूबियांचे मोठे उत्पादन होते. अनेक शेतकऱ्यांचे हे उदरनिवार्हाचे साधन असून, या दोन्ही जिल्ह्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड तालुक्यांतही काजूचे मोठे पीक येते. या पिकाच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत कीड, रोग यांचा मोठा परिणाम होतो. शेतकऱ्यांना येणाऱ्या या अडचणींचा विचार करून या पिकाच्या सर्वंकष विकासासाठी ही समिती नेमण्यात आली आहे.गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये आजऱ्यातील भाजपचे कार्यकर्ते दयानंद भुसारी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चंदगड येथील दयानंद काणेकर आणि रमेश अनंत मुळीक यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.कोकण विभाग हे या समितीचे कार्यक्षेत्र असून, दोन महिन्यांच्या कालावधीत या समितीने आपला अहवाल द्यावयाचा आहे. उत्पादक शेतकरी, उद्योजक यांच्याशी चर्चा करून या व्यवसायाबाबतच्या अडचणी समजून घ्यावयाच्या असून, त्यानंतर अभिप्रायासह अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे. 

 

टॅग्स :fruitsफळेGovernmentसरकारzpजिल्हा परिषद