शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

कोल्हापूर : प्रत्येक विभागात कारागीर विद्यापीठ स्थापन करणार : संभाजीराव पाटील निलंगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:38 IST

कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी येथे केले.

ठळक मुद्देसिद्धगिरी ज्ञानपीठासाठी प्रयत्नशील : संभाजीराव पाटील निलंगेकरसिद्धगिरी कारागीर महाकुंभातील ‘कारागीर उत्सव’ परिसंवादाचे उदघाटन

कोल्हापूर : कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी येथे केले.

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित सिद्धगिरी कारागीर महाकुंभातील ‘कारागीर उत्सव’या परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गो संवर्धन, कृषी व ग्रामविकास मार्गदर्शक हृदयनाथसिंह, तर राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष नरेंद्रनाथ मेहरोत्रा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयाचे डॉ. मनोजकुमार प्रमुख उपस्थित होते.

कामगार व कौशल्य विकास मंत्री पाटील निलंगेकर म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये सहा कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिले विद्यापीठ चंद्रपूरमध्ये उभारणार आहे. यामध्ये जंगल परिसरातील उत्पादन, कौशल्याला बळ दिले जाणार आहे. राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष मेहरोत्रा म्हणाले, स्मार्ट व्हिलेज नको समृद्ध ग्राम बनणे आवश्यक आहे.

कारागीरांचे विश्वविद्यालय उभे रहावे. डॉ. मनोजकुमार म्हणाले, विकासाच्या नावाखाली कारागिरी मारली गेली आहे. गावांना पुनर्रजीवन देणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात कौशल्य विकास विभागाअंतर्गत असणाऱ्या प्रशिक्षण संस्थांच्यावतीने ७५ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मंत्री पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सिद्धगिरी महासंस्थानला सुर्पूद करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्यामबिहारी गुप्ता, गोपाल उपाध्याय, कानसिंग निर्माण, विवेक चतुर्वेदी, वर्धा येथील मगन संग्रहालयच्या अध्यक्ष विभा गुप्ता, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक करीम, सिद्धगिरी मठाचे कार्यकारी संचालक आर. डी. शिंदे, पी. डी. कांबळे, बी. जी. मांगले, आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील निलंगेकर म्हणाले

  1. *कौशल्य विकासासह शेतकरी, कारागिरांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास शासनाचे प्राधान्य
  2. *सिद्धगिरी मठाने पुढाकार घेवून गुरुकुल शिक्षण पद्धती विकसित करावी.
  3. * स्वयंपूर्ण गावांच्या निर्मितीसाठी कारागिरांच्या कलेला अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे.

 

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूर