शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अकरावी प्रवेश प्रक्रिया; दुसऱ्या दिवशी १६०४ अर्जांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 12:15 IST

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी एकूण १६०४ अर्जांचे वितरण, तर ११४७ अर्जांचे संकलन झाले. राजर्षी शाहू जयंतीची महाविद्यालयांना सुटी असली, तरी प्रवेश प्रक्रिया सुरू राहिल्याने अर्ज वितरण-संकलन केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी राहिली.

ठळक मुद्दे अकरावी प्रवेश प्रक्रियादुसऱ्या दिवशी १६०४ अर्जांचे वितरण

कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी एकूण १६०४ अर्जांचे वितरण, तर ११४७ अर्जांचे संकलन झाले. राजर्षी शाहू जयंतीची महाविद्यालयांना सुटी असली, तरी प्रवेश प्रक्रिया सुरू राहिल्याने अर्ज वितरण-संकलन केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी राहिली.शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेचा सोमवारी (दि. २५) प्रारंभ झाला.

कोल्हापुरात अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्र हायस्कूल अ‍ॅँड ज्युनिअर कॉलेज या केंद्रावर विद्यार्थिनींनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)दुसऱ्या मंगळवारी पावसाने उघडीप दिल्याने अर्ज वितरण आणि संकलन केंद्रांवर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वर्दळ दिसून आली. दिवसभरात एकूण १६०४ अर्जांचे वितरण झाले. त्यात कला शाखेच्या मराठी माध्यमाच्या २२९, इंग्रजी माध्यमाच्या ११, विज्ञान शाखेच्या ७६९, वाणिज्य शाखेच्या मराठी माध्यमाच्या ४१५, इंग्रजी माध्यमाच्या १८० अर्जांचा समावेश आहे.संकलित झालेले एकूण अर्ज ११४७ आहेत. त्यामध्ये विज्ञानचे ५६२, कला मराठीचे ११२, इंग्रजीचे सहा, वाणिज्य मराठीचे २८६, इंग्रजीचे १८१ अर्ज आहेत.

दरम्यान, प्रवेशपत्र विनामूल्य द्यावे. विनाअनुदानित तुकड्यांचे प्रवेश शुल्क कमी करावे, या मागण्यांसाठी आॅल इंडिया स्टुडंट्स, यूथ फेडरेशनने सोमवारी आंदोलन केले होते. या फेडरेशनचे शिष्टमंडळ आणि प्रवेश प्रक्रिया समितीची संयुक्त बैठक आज, बुधवारी शहाजी महाविद्यालयात होणार आहे.

 

 

 

टॅग्स :Educationशिक्षणkolhapurकोल्हापूर