शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पावसामुळे एस.टी.चे ११ लाखांचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:45 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे एस.टी.चे ११ लाखांचे उत्पन्न बुडालेदोन दिवसांत ३९ हजार किलोमीटर रद्द; १ हजार फेऱ्या ठप्प

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. एस. टी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असली तरी प्रवाशांना यांचा आर्थिक फटका मात्र बसत आहे.कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर रजपूतवाडीजवळ पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पुणे-बंगलोर महामार्गावरून बोरपाडळेमार्गे वळविण्यात आली आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर टेकवाडीजवळ पाणी आल्याने कोकणात जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे. कळे येथे पाणी आल्याने बाजारभोगावला जाणारी वाहतूक बंद आहे. भडगाव पुलावर पाणी आल्याने गडहिंग्लजमधून नेसरी, चंदगडला जाणारी वाहतूक आजरामार्गे वळविली आहे.

३९ हजार किलोमीटर रद्दकोल्हापूर विभागातील कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा, आजरा या बारा आगारांतील दोन दिवसांत १ हजार १७ गाड्यांच्या फेऱ्या पावसामुळे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एकूण ३९ हजार ५०५ किलोमीटरचा प्रवास रद्द झाल्याने सुमारे ११ लाख ४८८ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर