शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी वादग्रस्त कर्मचाऱ्यांवर ३१ पर्यंत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 14:25 IST

नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चौकशी करून ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी बैठकीमध्ये दिल्याने पतित पावन संघटनेचे नियोजित ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. या चर्चेवेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर हेही उपस्थित होते.

ठळक मुद्दे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी वादग्रस्त कर्मचाऱ्यांवर ३१ पर्यंत कारवाईशासकीय महाविद्यालयातील  प्रकरण : अधिष्ठात्याचे ‘पतित पावन’ संघटनेशी बैठकीत लेखी आश्वासन

कोल्हापूर : नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चौकशी करून ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी बैठकीमध्ये दिल्याने पतित पावन संघटनेचे नियोजित ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. या चर्चेवेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर हेही उपस्थित होते.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालयात नोकरी मिळविण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडण्यात आल्याची माहिती गेल्या वर्षी उघडकीस आली. त्या अनुषंगाने चौकशीची कार्यवाही सुरू होती.

त्याबाबतचा अहवाल दि. ५ डिसेंबर रोजी प्रशासनास प्राप्त होऊनही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ येथील पतित पावन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सीपीआर रुग्णालयात बैठक आयोजित केली होती.यावेळी पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, बजरंग दल जिल्हाप्रमुख बंडा साळुंखे, महेश उरसाल, राजेंद्र सूर्यवंशी, विशाल पाटील, अवधूत भाट्ये, सूरज निकम, आशिष बराले, सतीश निकम, ऋषभ मोरे, निवास पाटील, राजू पाटील, समीर सुतार हे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

तत्काळ निलंबन कराया वादग्रस्त कर्मचाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्यावर कारवाईसाठी महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी डॉ. नणंदकर यांनी केली; पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. गेली १५ वर्षे या कर्मचाऱ्यांनी नोकरी केली आहे.

त्यांच्याकडून दिलेले भत्ते व सेवासुविधा वसूल कराव्यात; तसेच त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी आग्रही मागणी केली; पण त्यांना नोटीस काढून कारवाईची प्रक्रिया पूर्ण आश्वासन दिले. त्यामुळे संघटनेने त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्याबाबत प्रशासनाने कारवाईचे लेखी आश्वासन संघटनेस दिले.

 

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर