आंतरविभागीय ज्यूदो स्पर्धेत कोल्हापूरचे वर्चस्व

By Admin | Updated: November 25, 2015 00:53 IST2015-11-25T00:53:14+5:302015-11-25T00:53:46+5:30

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत स्पर्धा : तीन जिल्ह्यांतील शंभरावर खेळाडूंचा सहभाग

Kolhapur domination in inter divisional judo tournament | आंतरविभागीय ज्यूदो स्पर्धेत कोल्हापूरचे वर्चस्व

आंतरविभागीय ज्यूदो स्पर्धेत कोल्हापूरचे वर्चस्व

कोल्हापूर : कोतोली-माळवाडी (ता. पन्हाळा) येथील श्रीपतराव चौगुले महाविद्यालय यांच्यावतीने कुडित्रे येथे आयोजित केलेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय ज्यूदो स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने वर्चस्व राखले. या स्पर्धेत कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यांतील शंभराहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ‘कुंभी-कासारी’च्या युवराज पाटील कुस्ती संकुलात झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष के. एस. चौगले, सचिव शिवाजी पाटील, संचालक डॉ. अजय चौगले, प्राचार्य डॉ. अर्जुन पाटील आदी उपस्थित होते. प्रा. पी. एस. खाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. बी. एन. राणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. डी. बी. इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचा निकाल असा :
५६ किलो : रणवीरसिंह भोसले (विवेकानंद), भिकाजी पन्हाळकर (विठ्ठलराव, कळे), समीर गवस (बीपीएड् मिरज). ६० किलो : सचिन पाटील (स. ब. खाडे, कोपार्डे), चंद्रकांत रोडे (शिव-शाहूू, सरुड), स्वरूप संकपाळ (भोगावती, कुरुकली). ६६ किलो : सिद्धार्थ साळोखे, प्रताप पाटील (शहाजी, कोल्हापूर), अमोल पाटील (प्रयाग चिखली कॉलेज). ७३ किलो : स्वप्निल पाटील (खाडे, कोपार्डे), अमोल पाटील (हिरे कॉलेज, गारगोटी), दत्तात्रय कुलवमोडे (कळे, कॉलेज). ८१ किलो : हृषीकेश पाटील (भोगावती), हृषीकेश सदाशिव पाटील (खाडे, कोपार्डे), संदीप बोराटे (एन. डी. पाटील, सांगली). ९० किलो : प्रदीप नातुगडे (शिवाजी विद्यापीठ), भैरू माने (खाडे, कोपार्डेकर), श्रीमंत भोसले (आंबेडकर, वडगाव). १०० किलो : हर्षवर्धन थोरात (खाडे, कोपार्डे), सचिन माने (एमपी.एड्. मिरज), पुष्पेंद्र पाटील (खाडे, कोपार्डे). १०० किलोवरील : शंकर चौगुले (शहाजी, कोल्हापूर), ऋतुराज राऊत (खाडे, कोपार्डे).
मुली विभाग : ४४ किलो : प्रियांका पाटणकर (विलिंग्डन, सांगली), दीपिका शिंदे (विठ्ठल पाटील, कळे), हेमा गावडे (बीपीएड्. मिरज). ४८ किलो : करिष्मा जाधव (भारती विद्यापीठ), मेघा कोळपे (विलिंग्डन), पूनम शेंडगे (बाबा नाईक, कोकरुड). ५२ किलो : आलिया अन्सारी (विलिंग्डन), पूजा परूले (बाबा नाईक), अश्विनी काखे (शिव शाहू). ५७ किलो : सोनल मोळे (विवेकानंद), मेघा रावण (बाबा नाईक). ६३ किलो : प्रज्ञा फरांदे (किसन वीर, वाई), शीतल जाधव (बाबा नाईक). ७० किलो : वैष्णवी झेंडे (शहाजी), मर्जिना नायकवडी (बाबा नाईक).
७८ किलो : मनोरमा सोरटे (शाहू). ७८ किलोवरील : स्नुषा गवस (बीपीएड्. मिरज), धनश्री घाडगे : (आर. टी. आय. इस्लामपूर).

Web Title: Kolhapur domination in inter divisional judo tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.