कुरुंदवाड वेटलिफ्टिंगमध्ये कोल्हापूरचा दबदबा

By Admin | Updated: November 27, 2015 01:04 IST2015-11-27T00:51:40+5:302015-11-27T01:04:45+5:30

शालेय राज्यस्तरीय स्पर्धा : कोल्हापूरला २०, तर नाशिकला ५ सुवर्णपदके; विजेत्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Kolhapur dominance in Kurundwad weightlifting | कुरुंदवाड वेटलिफ्टिंगमध्ये कोल्हापूरचा दबदबा

कुरुंदवाड वेटलिफ्टिंगमध्ये कोल्हापूरचा दबदबा

कुरुंदवाड : येथील दत्त महाविद्यालयात शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने घेतलेल्या शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शेवटच्या दिवशीही कोल्हापूर विभागच भारी ठरला. १७ व १९ वर्षांखालील ८ विभागांतून एकूण ३० वजनी गटांत या स्पर्धा झाल्या. त्यामध्ये तब्बल २० सुवर्णपदके मिळवीत या स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखत कोल्हापूर विभाग वेटलिफ्टिंगमधील हीरो बनला आहे. त्यापाठोपाठ पाच सुवर्णपदके पटकावत नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. यजमान दत्त महाविद्यालयाने पाच सुवर्णपदके व संकेत सदलगे बेस्टलिफ्टर (उत्कृष्ट खेळाडू)चा मानकरी ठरला आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजेत्या स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी निवड समिती सदस्य बिभीषण पाटील, मधुराज सिहासेन, उज्ज्वला माने, कोल्हापूर विभागीय क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, प्राचार्य आप्पासाहेब माने, रावसाहेब पाटील, अजित पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
अखेरच्या दिवशी झालेल्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, कंसात विभाग व उचललेले एकूण वजन - १९ वर्षांखालील मुले - ७७ किलो वजनी गट - प्रथम - संकेत सदलगे (कोल्हापूर, २५० किलो), द्वितीय - विलास लोंढे (पुणे, २०० किलो), तृतीय निमेश पांडे (मुंबई, १७२). ८५ किलो वजनी गट - मनोज मगदूम (कोल्हापूर, २१५), गणेश काळे (पुणे, १९६), अभिषेक मिश्रा (अमरावती, १९२).
९४ किलो वजनी गट - अनिकेत कुंभार (कोल्हापूर, १८९), विघ्नेश पंडित (मुंबई, १६१), मनोहर गुलाटी (पुणे, १४२). १०५ किलो गट - मोहम्मद महारूफ (अमरावती, १५३), गणेश कांबळे (लातूर, १३०), दीपक वाघ (नाशिक, ११५). १०५ किलोवरील - अर्जुन मळगे (कोल्हापूर, १७३), भावेश कोलकर (मुंबई, १६२), अमित भोसले (पुणे, १६२).
१९ वर्षांखालील मुली - ५३ किलो गट - रूपाली हनगडी (क्रीडा प्रबोधिनी, १५०), रागिनी अहिरे (नाशिक, १०३), तनिष्का कोळी (कोल्हापूर, ८२). ५८ किलो वजनी गट - ऐश्वर्या कदम (कोल्हापूर, १५०), शिवानी मोरे (मुंबई, १३७), पूजा परदेशी (नाशिक, १००). ६३ किलो वजनी गट - श्रद्धा पोवार (कोल्हापूर, १४९), प्राजक्ता खालकर (नाशिक, १४८), सोनल शेलार (पुणे, ९२). ६९ किलो गट - मयूरी देवरे (कोल्हापूर, १५५), वृषाली पवार (पुणे, १००), पायल टुले (नागपूर, ६३). ७५ किलो वजनी गट - अनुजा सावंत (कोल्हापूर, १०६), श्रृती जाधव (पुणे, ९२). ७५ किलोवरील - अश्विनी मळगे (कोल्हापूर, १५५), समृद्धी झवर (अमरावती, १०१), ऐश्वर्या सोमनाथ (पुणे, ७०).
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पंच म्हणून प्रदीप पाटील, विजय माळी, रवींद्र चव्हाण, बिहारीलाल दुबे, संतोष सिंहासने, प्रवीण व्यवहारे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)



चार गटांतून उत्कृष्ट खेळाडू (बेस्ट लिफ्टर) - मुली - रूपाली महादेव हनगडी (क्रीडा प्रबोधनी), संस्कृती जितेंद्र देवकर (कोल्हापूर). मुले - महेश दत्ता अस्वले (पुणे), संकेत कुमार सदलगे (कोल्हापूर).

Web Title: Kolhapur dominance in Kurundwad weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.