शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :वेतनश्रेणीचा शिक्षकांचा हक्क हिरावून घेऊ नका, शिक्षणमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 13:38 IST

शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या मिळणाऱ्या वेतनश्रेणींसाठी घातलेल्या अटी या नैसर्गिक हक्कांवर गदा असून हा आदेश रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर :वेतनश्रेणीचा शिक्षकांचा हक्क हिरावून घेऊ नकाकोल्हापूर शिक्षक संघटना समन्वय समितीचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर : शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या मिळणाऱ्या वेतनश्रेणींसाठी घातलेल्या अटी या नैसर्गिक हक्कांवर गदा असून हा आदेश रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक सोडून अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी असतात. एकाच वेतनश्रेणीमध्ये १२ वर्षे काम करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्याला चटोपाध्याय तथा वरिष्ठ वेतनश्रेणी मिळत होती. २४ वर्षे पदोन्नती न मिळता एकाच वेतनश्रेणीत काम करणाऱ्या शिक्षकांना निवड श्रेणी मिळत होती.मात्र शिक्षण विभागाने २३ आॅक्टोबर २०१८ रोजी काढलेल्या आदेशानुसार यासाठी संबंधित शिक्षकाची शाळा ‘शाळा सिद्धी’मध्ये ‘अ’ वर्गामध्ये येण्याची तसेच माध्यमिक शाळांना नववी आणि दहावीसाठी ८० टक्क्यांपेक्षा जास्त निकालाची अट घातली आहे.एकीकडे गेल्या वर्षभरात शाळा सिद्धीची तपासणीही झाली नसताना केवळ शिक्षकांचा नैसर्गिक हक्क हिरावून घेण्यासाठीच या अटी घातल्या गेल्या आहेत. प्रत्येक शाळेचे यश सांघिक प्रयत्नांवर अवलंबून असताना, शाळेसाठी भौतिक सुविधा देण्याची शासनाची जबाबदारी असताना आणि यातील अनेक जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे असताना शिक्षकांचे हक्क हिरावून घेणारा हा आदेश रद्द करावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.समितीचे अध्यक्ष रविकुमार पाटील, नेते मोहन भोसले, सचिव सुरेश कोळी यांनी हे निवेदन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना दिले आहे..

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूर