शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सिनेमातील वाईट गोष्टींचे अंधानुकरण करु नका : अजय कुरणे, बाल स्नेहसंमेलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:29 IST

कोल्हापूर : सिनेमातील वाईट गोष्टींचे अंधानुकरण करू नका, असे आवाहन करत प्रसिद्ध सिने दिग्दर्शक अजय कुरणे यांनी तुम्ही जेंव्हा आवडणारी गोष्ट मनापासून करता तेंव्हा तीच कृती तुम्हाला आयुष्यात मोठं बनविते, असे अनुभवाचे बोल विद्यार्थ्यांना ऐकवले. येथील शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये सुरू असलेल्या बाल स्नेहसंमेलनात बुधवारी लघुपटाविषयीच्या सत्रात ते बोलत होते.कोल्हापुरातील ...

ठळक मुद्देडु फ्लॉवर फ्लाय, कॅमेरा, द किड लघुपटांचा विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद फनफेअर, लोकनृत्याचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंददोनदिवसीय बाल स्नेहसंमेलनाची सांगता वाचनकट्ट्याला न्यू हायस्कूलसह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिली भेट

कोल्हापूर : सिनेमातील वाईट गोष्टींचे अंधानुकरण करू नका, असे आवाहन करत प्रसिद्ध सिने दिग्दर्शक अजय कुरणे यांनी तुम्ही जेंव्हा आवडणारी गोष्ट मनापासून करता तेंव्हा तीच कृती तुम्हाला आयुष्यात मोठं बनविते, असे अनुभवाचे बोल विद्यार्थ्यांना ऐकवले. येथील शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये सुरू असलेल्या बाल स्नेहसंमेलनात बुधवारी लघुपटाविषयीच्या सत्रात ते बोलत होते.

कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूल येथील बालस्नेहसंमेलनात दिग्दर्शक अजय कुरणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.येथील शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय बाल स्नेहसंमेलनाची सांगता बुधवारी झाली. पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी यावेळी डु फ्लॉवर फ्लाय, कॅमेरा, द किड या लघुपटांचा आस्वाद घेतला. यावेळी कुरणे यांनी विद्यार्थ्यांशी मुलांच्या भावविश्वाशी निगडित लघुपट आणि चित्रपट निर्मितीसंदर्भात संवाद साधला. ते म्हणाले, सिनेमातील कथा, अभिनय म्हणजे सिनेमा नव्हे, त्याची निर्मिती लक्षात घ्या, त्यामागील कष्ट लक्षात घ्या, मग तुम्हाला त्याचे खरे महत्व समजेल. सविता प्रभावळे यांच्या हस्ते अजय कुरणे यांचे स्वागत करण्यात आले. या नंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांनी लोक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.

सकाळच्या सत्रात साहित्यिकांचे माहिती प्रदर्शन असलेल्या वाचनकट्ट्याला न्यू हायस्कूलसह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट दिली.

या बाल स्नेहसंमेलनाची सारी सूत्रे विद्यार्थ्यांनीच सांभाळली. स्वागताध्यक्ष घनश्याम शिंदे याने प्रास्ताविक केले. समर्थ याने पाहुण्यांची ओळख करून दिली, तर करिना धनवडे हिने सूत्रसंचालन केले. माधुरी सुतार हिने आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक पी. डी. काटकर, कलाशिक्षक मिलिंद यादव उपस्थित होते.लोकनृत्याचा घेतला विद्यार्थ्यांनी आनंदशाळेतील विद्यार्र्थ्यानी या बालस्नेहसंमेलनाच्या निमित्ताने फनफेअर आणि लोकनृत्याचा आनंद घेतला. अंधश्रध्देवर प्रहार करणाऱ्या विषयाशी संबंधित लोकनृत्याचा आविष्कार आणि ग्रामीण संस्कृतीचा परिचय देणाऱ्या फनफेअरनंतर या संमेलनाचा समारोप झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळा