शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेखच्या क्रीडा स्पर्धांमध्ये कोल्हापूरला विजेतेपद; पाच जिल्ह्यांतील ७०० हून अधिक जणांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:36 IST

‘सांस्कृतिक’मध्ये पुण्याची बाजी

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या पुणे विभागीय भूमी अभिलेख कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये कोल्हापूर भूमी अभिलेख विभागाने सांघिक खेळ प्रकारात विजेतेपद पटकाविले.२ ते ४ जानेवारीदरम्यान झालेल्या या स्पर्धांमध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील ७०० हून अधिक भूमी अभिलेखचे कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते. एरव्ही वाड्या-वस्त्यांवर मोजणीच्या कामासाठी धावणारे कर्मचारी-अधिकारी या स्पर्धांच्या निमित्ताने मैदानावर धावताना पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांमध्ये सामूहिक एकीची भावना वाढीस लागावी, त्यांच्यामध्ये आरोग्याची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.अपर जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी धुंदवडे (ता. गगनबावडा) येथील जय जिजाऊ विद्यामंदिर लेझीम पथकाच्या सादरीकरणाने या क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. यामध्ये १००, २०० मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक, कॅरम, बुद्धिबळ, बॅटमिंटन, टेबल टेनिस या वैयक्तिक खेळासोबत क्रिकेट, फुटबॉल, खोखो, रस्सीखेच यासह विविध खेळ घेण्यात आले.सांघिक प्रकारात कोल्हापूर जिल्हा भूमी अभिलेख विभागाने विजेतेपद, तर सांगलीने उपविजेतेपद पटकाविले. राजाराम कॉलेजच्या सभागृहात झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात पुणे जिल्ह्याने विजेतेपदावर नाव कोरले. यामध्ये कोल्हापूरला उपविजेतेपद मिळाले.सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना कर्मचारी तहानभूक हरपून गेले. हा कर्मचारी, तो साहेब ही भावनाच पुसली गेली आणि सर्वजण सांस्कृतिक आनंदात तल्लीन होऊन गेले. या कार्यक्रमाला उपसंचालक राजेंद्र गोळे, कोल्हापूरचे जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले, पुणे जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे, सातारचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक वसंत निकम, सांगलीच्या सुरेखा शेटये, सोलापूरचे दादासाहेब घोडके उपस्थित होते.उत्तम नियोजन या स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले, करवीरचे अधीक्षक किरण माने यांनी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सक्षमपणे पार पाडली. त्याबद्दल सर्वांनीच त्यांना धन्यवाद दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणे