शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Hasan Mushrif: मंत्री हसन मुश्रीफांच्या टोपीखाली नेमकं दडलंय काय?, गांधी टोपीची जिल्हाभर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 12:59 IST

पालकमंत्री सतेज पाटील यांच्याही दाढीची चर्चा

समीर देशपांडेकोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटा बांधायचे सोडून दिले आहे. मात्र पांढरी शुभ्र टोपी गेल्या महिन्यापासून ते वापरत आहेत. त्यांच्या या टोपीखाली दडलंय काय अशी विचारणा आता जिल्हाभरातून होत आहे. याबाबत मी नंतर सांगेन असे म्हणत मुश्रीफ यांनीही याबाबतचे ‘गुपित’ कायम राखले आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘शिवस्वराज्य’ कार्यक्रमामध्ये गुढी उभारण्यासाठी मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील सोमवारी भल्या सकाळी कागलकर हाऊसच्या प्रांगणात उपस्थित होते. आधी पालकमंत्री आले. त्यांना फेटा बांधण्यासाठी खुर्चीत बसवण्यात आले. दुसऱ्या मिनिटाला मुश्रीफ दाखल झाले. पाटील यांनी मुश्रीफ यांना फेटा बांधण्यासाठी बसण्याची विनंती केली.

मात्र मुश्रीफ म्हणाले, मी फेटा बांधून घेणार नाही. या टोपीखाली दडलंय काय हे मी नंतर सांगेन. असे म्हणत मुश्रीफ यांनी टोपी परिधान का केली याचे ‘गुपित’ तसेच कायम ठेवले. गेल्या महिन्यापासून मुश्रीफ यांच्या डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी दिसून येत आहे. सुरुवातीला केस काळे करताना डोक्यावर जरा काळा डाग पडल्याने त्यांनी टोपी वापरायला सुरूवात केली.परंतु महिना उलटून गेला तरी त्यांनी टोपी काढलेली नाही. कागल तालुक्यातील रविवारी झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी सत्कारावेळी फेटा बांधून घेतला नाही. त्यांचे आता जिगरी दोस्त झालेले संजयबाबा घाटगे यांनीही मग फेटा नाकारला. फेटा नाकारून मुश्रीफ गांधी टोपीकडे कसे वळले याची चर्चा सुरू झाली आहे.कार्यकर्त्यांच्या मते ही असू शकतात कारणे

  • राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढवण्याचा पण
  • जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, कोल्हापूर महापालिकेचा महापौर राष्ट्रवादीचा करणार
  • त्यांच्याविरोधात जी आरोपांची राळ उडवली जात आहे त्यातून निर्दोष सिद्ध होत नाही ताेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी असू शकते प्रतिज्ञा.
  • यापेक्षा काही वेगळे कारण असल्यास ते मात्र गुपितच. 

सतेज पाटील यांच्याही दाढीची चर्चापालकमंत्री सतेज पाटील यांच्याही दाढीची चर्चा सुरू आहे. याआधीही दक्षिणमधून पराभव झाल्यानंतर सतेज पाटील यांनी दाढी वाढवली होती. त्यानंतर एकेक करत त्यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत महाडिक परिवाराची सत्तास्थाने उद्ध्वस्त केली. आता आणखी त्यांनी कुठला नवा पण केला आहे याचीच जिल्ह्यात चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ