शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सुकन्या समृद्धी योजनेत कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल, गुंतवले तब्बल 'इतके' कोटी; मुलींचे भवितव्य सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 17:27 IST

वयाच्या १० वर्षांपर्यंत काढता येते खाते

कोल्हापूर : आपल्या मुलींचे भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करत कोल्हापूरकरांनी पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेत तब्बल ३५६ कोटी, ३८ लाख ३४ हजार १०० रुपये इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक केली आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख २० हजार १६१ मुलींच्या नावे ही खाती सुरू असून या योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात अव्वल स्थानावर आहे.बेटी बचाव बेटी पढाव, अभियानांतर्गत २०१५ साली पोस्ट ऑफीसमध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू झाली. तेव्हापासून जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पहिल्या वर्षी १२ हजार ७८१ मुलींच्या नावे दाेन कोटी ८३ लाख ६८ हजार ३० रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आता तब्बल ३५६ कोटींच्या पुढे गेला आहे.वयाच्या १० वर्षांपर्यंत काढता येते खातेमुलीच्या जन्मापासून १० वर्षे वयाच्या आतील मुलींच्या नावे हे खाते काढता येते. जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावे खाते काढता येतात. ही योजना मुलीचे शिक्षण व लग्नासाठीच्या गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे.

७.६ टक्के व्याजकमीतकमी २५० रुपये भरून खाते काढता येते व जास्तीत दीड लाखांपर्यंत रक्कम भरता येते. एका महिन्यात किंवा वर्षात कितीही वेळा पैसे भरता येतात. या योजनेवर सर्वाधिक व्याजदर ७.६ टक्के आहे व गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते. या योजनेतील गुंतवणूक ८० सी अंतर्गत करमुक्त आहे.पैसे कधी काढता येणार?योजनेचा कालावधी २१ वर्षे किंवा मुलीच्या लग्नापर्यंत आहे. १८ वर्षांनी या खात्यातून जमा रकमेच्या जास्तीत जास्त ५० टक्क्यांपर्यंत पैसे काढता येतात. खाते काढून २१ वर्षे पूर्ण झाल्यावर मुदत पूर्ण होते व खाते बंद करता येते.

खाते काढण्यासाठी काय कागदपत्रे लागतात?मुलीच्या जन्म तारखेला दाखला, पालकांचे ओळखपत्र व रहिवासी दाखल्याची झेरॉक्स, पालकांचे दोन फोटो. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPost Officeपोस्ट ऑफिस