शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पारा १८ अंशांवर, थंडीने कोल्हापूरकर गारठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 19:25 IST

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातही तापमानात लक्षणीय घट झाली आहे. आज, गुरुवारी पहाटे शहराचा पारा १८ अंशांवर होता आणि धुक्याने ...

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातही तापमानात लक्षणीय घट झाली आहे. आज, गुरुवारी पहाटे शहराचा पारा १८ अंशांवर होता आणि धुक्याने अवघे कोल्हापूरकर वेढून गेल्याची प्रचिती पहाटे फिरणाऱ्यांना आली. दिवसभर हवेत असणारा गारठा रात्री आणखी वाढतो. त्यामुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.शेतीसाठी ही थंडी पोषक असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटी आलेल्या थंडीचा आता चांगलाच जम बसला आहे. उत्तर भारतात आलेल्या चक्रवातामुळे महाराष्ट्राच्या सर्वच भागात तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. शहरात दिवसभर हवेत गारठा असतो. रात्री आठ वाजल्यानंतर तापमानात घट होऊन लागते. त्यानंतर थंडीचा जोर वाढतो. पहाटे थंडी सर्वाधिक असून दाट धुके पसरलेले असते. जिल्ह्याचे तापमान पहाटे १८ अंश सेल्सियसपर्यंत खाली आल्याचे दिसून आले. दिवसभरात २९ अंश सेल्सियस तापमान होते. वाऱ्याचा वेगही ६.६५ इतका राहिला. ईशान्य मान्सूनचा जोर संक्रांती दरम्यान ओसरुन, तेथील हिवाळी पावसाचा हंगाम ह्या वर्षी १४ जानेवारीला आटोपला आहे. हा मान्सून डिसेंबरमधेच ओसरणार होता, मात्र यंदा त्याला वेळ लागला आहे. तेथील मान्सून बाहेर पडताच थंडीसाठी पूरकता वाढते. सरकलेल्या 'पोळ' (' रिज ')मुळेच उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांना हवेच्या उच्च दाबरुपी काल्पनिक भिंतीचा अडथळा दूर होवून महाराष्ट्रात काहींशीच थंडी वाढत आहे. सध्याच्या 'एल-निनो' च्या प्रभावामुळे, एकापाठोपाठ पास होणारे पश्चिम झंजावात हे कमी तीव्रतेनेच पास होत आहे. उत्तर भारतातही सध्या थंडीची तीव्रता कमीच आहे म्हणूनच महाराष्ट्रातही कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. मकर संक्रांतीनंतर पृथ्वीचा दक्षिण गोलार्धातील भाग हळूहळू सूर्यापासून दूर तर विषववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातील भाग पुन्हा सूर्यासमोर अधिक येणे म्हणजेच पृथ्वीचे उत्तरायण चालू होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरweatherहवामान