शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

Kolhapur: ‘गोकुळ’चा कारभारी बदलणार; आबाजी की चौगले नेते ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:44 IST

डोंगळे यांची २५ मेपर्यंत मुदत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) कारभारी (अध्यक्ष) बदलणार हे निश्चित असून या ठिकाणी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील की बाबासाहेब चौगले यांना संधी द्यायची हे नेतेच ठरवणार आहेत. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांची अध्यक्षपदाची नेत्यांनी ठरवून दिलेली मुदत २५ मे रोजी संपत असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत.चार वर्षांपूर्वी ‘गोकुळ’च्या झालेल्या निवडणुकीत विश्वास पाटील व अरुण डोंगळे हे विरोधी आघाडीत सामील झाल्याने सत्तेचे गणित सोपे झाले होते. दोघांना सोबत घेताना सत्तेनंतर प्रत्येकाला दोन-दोन वर्षे अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार विश्वास पाटील यांच्या दोन वर्षांनंतर डोंगळे यांना संधी मिळाली. त्यांची मुदत संपत आल्याने नवीन अध्यक्ष कोण ? याविषयी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षपद आणखी एक वर्ष मिळावे, यासाठी अरुण डोंगळे हे प्रयत्नशील आहेत. सर्वपक्षीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याने फायदा होईल, असे त्यांना वाटते; पण तशी मानसिकता नेत्यांची नाही. डोंगळे यांना मुदतवाढ दिली तर विश्वास पाटील यांच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे ठरलेल्या फाॅर्मुल्यानुसारच प्रत्येकाला संधी मिळणार आहे.आगामी वर्ष हे निवडणुकीचे असल्याने विरोधक आक्रमक होणार आहेत. निवडणुकीच्या जोडण्या लावणारा चेहरा नेत्यांना द्यावा लागणार आहे. सत्तारूढ गटात डोंगळे, विश्वास पाटील व बाबासाहेब चौगले हे जुने चेहरे आहेत. विरोधकांचे हल्ले परतवून लावण्यासाठी विश्वास पाटील यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते.जिल्ह्यातील ठरावधारकांशी त्यांचा थेट सबंध आहेच, त्याचबरोबर पॅनलसाठी जोडण्या लावण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्याचा फायदा पॅनलला होऊ शकतो. त्यातून त्यांचे नाव पुढे येऊ शकते. पाचव्या वर्षी नवीन चेहऱ्याला संधी द्यायची ठरली, तर आमदार सतेज पाटील यांचे समर्थक बाबासाहेब चौगले हे बाजी मारणार. विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्या सहकार्याने त्यांना निवडणुकीला सामोरे करण्याची रणनीती नेत्यांची असू शकते.

मुदतीअगोदरच राजीनामा देणार?विश्वास पाटील यांनी दोन वर्षांची मुदत संपण्याआधीच नेत्यांकडे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तीच परंपरा अरुण डोंगळे राखण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ