कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचा पुन्हा बालेकिल्ला व्हावा:अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:36 IST2019-01-29T00:36:16+5:302019-01-29T00:36:21+5:30

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा राष्टÑीय कॉँग्रेसचा पुन्हा बालेकिल्ला होईल यादृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्टÑ प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष ...

Kolhapur District Congress should be reunited again: Ashok Chavan | कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचा पुन्हा बालेकिल्ला व्हावा:अशोक चव्हाण

कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचा पुन्हा बालेकिल्ला व्हावा:अशोक चव्हाण

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा राष्टÑीय कॉँग्रेसचा पुन्हा बालेकिल्ला होईल यादृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्टÑ प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. जिल्हा कॉँग्रेस समितीचे नूतन अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सोमवारी प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी चव्हाण बोलत होते.
राष्टÑीय कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची निवड झाली. त्यानंतर प्रथमच आवाडे यांनी खासदार चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी चव्हाण यांनी आवाडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली. चर्चेवेळी आवाडे यांनी, कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊ, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी आमदार सतेज पाटील, प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश सातपुते, तौफिक मुल्लाणी, माजी मंत्री अब्दुल सत्तार, इचलकरंजी कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रकाश मोरे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, महेश सातपुते, रामदास कोळी, नरसिंह पारिक, आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur District Congress should be reunited again: Ashok Chavan