शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘ईएसआयसी’च्या प्रश्नांबाबत चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 18:02 IST

राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआयसी) आरोग्य सेवा, औषधांचा पुरवठा आदींबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आठवड्याभरात चर्चा करावी. प्रश्न मार्गी लावण्याबाबतचा आराखडा आम्हाला तयार करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या कोल्हापूर शाखेने सोमवारी केली. या मागणीसाठी श्रमिक महासंघाने पालकमंत्री पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्दे‘ईएसआयसी’च्या प्रश्नांबाबत चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चापालकमंत्र्यांनी चर्चा करावी; सर्व श्रमिक महासंघाची मागणी

कोल्हापूर : राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआयसी) आरोग्य सेवा, औषधांचा पुरवठा आदींबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आठवड्याभरात चर्चा करावी. प्रश्न मार्गी लावण्याबाबतचा आराखडा आम्हाला तयार करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या कोल्हापूर शाखेने सोमवारी केली. या मागणीसाठी श्रमिक महासंघाने पालकमंत्री पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला.येथील विक्रम हायस्कूलपासून मोर्चाला सुरुवात झाली. ‘ईएसआयसी आमच्या हक्काचे’, ‘ईएसआयसीची आरोग्यसेवा, औषधे मिळालीच पाहिजेत’, अशा घोषणा देत मोर्चा पुढे सरकत राहिला. मध्यवर्ती बसस्थानक, दाभोळकर कॉर्नर, सासने मैदान, धैर्यप्रसाद हॉलमार्गे ताराराणी चौक परिसरातील संपर्क कार्यालयावर मोर्चा आला.

या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनकर्त्यांची सभा झाली. त्यामध्ये श्रमिक महासंघाचे अध्यक्ष अतुल दिघे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातून ईएसआयसीकडे अंदाजे २०० कोटी रुपये जमा होतात; परंतु या बदल्यात कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. याबाबत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पालकमंत्री पाटील यांच्याकडे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला; पण, त्यांच्या कार्यमग्नतेमुळे त्यांना चर्चेसाठी वेळ मिळाला नाही; त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज मोर्चा काढला.

निवेदनाद्वारे आम्ही मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी आठवड्याभरात आमच्या संघटनेचे कार्यकर्ते आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करावी. हे प्रश्न सोडविण्यासाठी आराखडा निश्चित करून द्यावा. या सभेनंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील यांचे विशेष कार्यअधिकारी बी. बी. यादव यांना निवेदन दिले. या मोर्चात प्रकाश कांबरे, सुरेश पाटील, सुनील बारवाडे, धोंडिबा कुंभार, अनंत कुलकर्णी, गोपाल पाटील, आदींसह कामगार सहभागी झाले.

निवेदनाद्वारे मांडलेले कामगारांचे प्रश्न

  1.  ईएसआयसीचे १00 खाटांचे रुग्णालय बंद आहे.
  2. इचलकरंजीमध्ये ईएसआयसीसाठी दरमहा ८५ हजार भाडे देऊन जागा घेण्याच्या प्रकाराची चौकशी व्हावी.
  3.  द्वितीय स्तरावर नेमलेल्या रुग्णालयात कामगार आणि त्यांच्या कुटुंबीय रुग्णांकडून पैसे घेऊन उपचार केले जातात.
  4.  कामगार, त्यांच्या कुटुंबीयांना रक्तदाब, मधुमेहावरील औषधेदेखील मिळत नाहीत.
  5.  दिवस-रात्र मोफत औषध उपलब्ध होण्यासाठी ईएसआयसीने औषध दुकान नेमलेले नाही.
  6. कंत्राटदार हे कामगारांच्या रेकॉर्डमध्ये खोटे दस्तऐवज तयार करून भ्रष्टाचार करत आहेत.

 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील