शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरी तालुक्यात थेट पाईपलाईन तिसऱ्यांदा फुटली, शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 16:36 IST

व्ही. जे. साबळे तुरंबे : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेला तुरुंबे (ता. राधानगरी ) ...

व्ही. जे. साबळेतुरंबे : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेला तुरुंबे (ता. राधानगरी ) येथे आज पहाटे मोठ्या प्रमाणावर गळती लागली. या गळतीमुळे आसपासच्या परिसरातील  शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सायंकाळी पाच नंतर गळती कमी झाली. मात्र थेट पाईपलाईनमुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण अशी विचारणा केली जात आहे. या परिसरात गेल्या तीन महिन्यात तिसऱ्यांदा पाईपलाईनला गळती लागली आहे.कोल्हापूर शहराला  काळम्मावाडी धरणाचे पाणी देण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्चून पाईपलाईन योजना अखेर सुरू झाली. मात्र या योजनेला गळतीचे ग्रहण लागले आहे. आज गुरुवारी मध्यरात्री तुरंबे कपिलेश्वर मार्गावर बाळासाहेब शेटगे यांच्या शेताजवळ मोठे भगदाड पडले आणि पाईपलाईनमधून पाणी वाहू लागले. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. शिवाय या परिसरातील ऊस पिकामध्ये पाणी शिरल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले. गळती लागल्याचे लक्षात येताच नेमके पाणी बंद कसे करायचे कोणाशी संपर्क साधायचा याबद्दल कोणतीही पूर्व सूचना देण्यासाठीची तरतूद या थेट पाईपलाईनच्या मार्गावर कुठेही नसल्यामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण अशी विचारणा ग्रामस्थांतून होत आहे.

कोल्हापूर शहराला थेट पाणी देण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु थेट पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे आणि यामध्ये मलिदा मिळवण्यासाठीच हा सगळा खटाटोप केलेला दिसतो. अशा प्रकारे शेतीचे वारंवार नुकसान होत असेल तर प्रशासनाने गंभीर विचार केला पाहिजे  - अजित पोवार, माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी