शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

कोल्हापूर : ध्यानचंद हॉकी स्टेडियम ‘अ‍ॅस्ट्रोटर्फ’चा मार्ग मोकळा, संभाजीराजे यांचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:13 AM

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे गेल्या अनेक वर्षांपासून अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी आहे. याप्रश्नी खासदार संभाजीराजे हे पाठपुरावा करीत आहेत. शुक्रवारी याकामी त्यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांची भेट घेतली. त्यावर राठोड यांनी या मैदानासाठी आवश्यक निधीची त्वरित तरतूद करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा अ‍ॅस्ट्रोटर्फ दृष्टिक्षेपात येणार आहे.

ठळक मुद्देध्यानचंद हॉकी स्टेडियम ‘अ‍ॅस्ट्रोटर्फ’चा मार्ग मोकळासंभाजीराजे यांचा पाठपुरावा; आवश्यक निधी देऊ - राजवर्धनसिंह राठोड यांची ग्वाही

कोल्हापूर : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे गेल्या अनेक वर्षांपासून अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी आहे. याप्रश्नी खासदार संभाजीराजे हे पाठपुरावा करीत आहेत. शुक्रवारी याकामी त्यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांची भेट घेतली. त्यावर राठोड यांनी या मैदानासाठी आवश्यक निधीची त्वरित तरतूद करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा अ‍ॅस्ट्रोटर्फ दृष्टिक्षेपात येणार आहे.गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉकीसाठी अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदान मिळावे, याकरिता हॉकीप्रेमी प्रयत्न करीत होते. खासदार संभाजीराजे यांनीही मागील वर्षापासून त्याचा पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत ‘खेलो इंडिया’अंतर्गत या मैदानासाठी निधी द्यावा, असे सुचविण्यात आले. मात्र, राज्य शासनाकडून याबाबतचा प्रस्तावच केंद्राकडे पाठविला नसल्याचे पुढे आले.

पुढे हा प्रस्ताव राज्य शासनाने पाठविला. त्यातून हे मैदान तयार करून दिले जाईल, असे त्यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री राठोड यांनी सुचविले होते. तेव्हा राज्याकडून हा टर्फचा प्रस्ताव पाठविलेला नव्हता. बैठकीनंतर तो केंद्राकडे पाठविण्यात आला. मात्र, याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी (दि. १५) ला क्रीडा मंत्रालयाच्या अवर सचिवांना दूरध्वनी करून विचारणा केली. त्यावर त्यांनी निधीची कमतरता असल्याचे सांगितले. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राठोड यांची भेट घेतली.

भेटीदरम्यान निधी मिळाला नसल्याचे त्यांच्या समोर आणले. त्यावर स्वत: राठोड यांनी तत्काळ निधी देण्याचे क्रीडा मंत्रालयाला निर्देश दिले. यासह निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही दिली. त्यामुळे तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महिन्याभरात हा निधी उपलब्ध होईल व हॉकीपटूंची गैरसोय दूर होऊन कोल्हापूरला अ‍ॅस्ट्रोटर्फ मिळणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. 

 

टॅग्स :Hockeyहॉकीkolhapurकोल्हापूर