शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Kolhapur: धनंजय महाडिक यांनी इनडोअर स्टेडियमच्या कामाला दिली स्थगिती, सतेज पाटील यांचा आरोप

By भीमगोंड देसाई | Updated: August 19, 2023 21:46 IST

Kolhapur: खेळाडूंसाठी कोल्हापुरात होणाऱ्या पहिल्या दहा कोटींच्या इनडोअर स्टेडियमच्या कामाला खासदार धनंजय महाडिक यांनी स्थगिती दिली. त्यांनी निधी दुसरीकडे वळवला आहे, असा आरोप माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी केला.

- भीमगोंडा देसाईकोल्हापूर - खेळाडूंसाठी कोल्हापुरात होणाऱ्या पहिल्या दहा कोटींच्या इनडोअर स्टेडियमच्या कामाला खासदार धनंजय महाडिक यांनी स्थगिती दिली. त्यांनी निधी दुसरीकडे वळवला आहे, असा आरोप माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी केला. त्यांचे सरकार आहे. निधी खिरापतीप्रमाणे वाटप केले जात आहे. त्यांनी विकासासाठी शासनाकडून वेगळा दहा कोटींचा निधी आणावा, असेही त्यांनी सूचवले.

आमदार पाटील म्हणाले, आम्ही पाठपुरावा करून दक्षिण विधानसभा मतदारसंघात इनडोअर स्टेडियमसाठी दहा कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्याची निविदा निघाली. वर्क ऑर्डर उद्या देणार म्हणजे आदल्या दिवशी कामाला स्थगिती देण्याचे पाप करण्यात आले आहे. हा खेळाडूंवर अन्याय आहे. इनडोअर स्टेडियमचा वापर विविध खेळाडूंना होणार होता. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेणे शक्य होते. यामुळे काम थांबवणे संयुक्तिक नाही.

शाहू महाराज उमेदवार असतील तर स्वागतच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. अजून उमेदवार कोण यावर चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडी एकसंध राहून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे. यातील ४० उमेदवार निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. या मतदारसंघात पुरोगामी विचारांचा उमेदवार असावा, असा आग्रह आहे. या मतदारसंघातून शाहू छत्रपती निवडणूक लढवणार असतील तर स्वागतच आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे.

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक