शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : धनंजय गुंडे पंचत्वात विलीन, मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 13:20 IST

कोल्हापूर येथील ख्यातनाम योगतजज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांच्यावर गुरूवारी दुपारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. डॉ. गुंडे यांचे बुधवारी सकाळी केरळमधील कल्पेट जि. वायनाड येथे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

ठळक मुद्देधनंजय गुंडे पंचत्वात विलीन मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

कोल्हापूर : येथील ख्यातनाम योगतजज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांच्यावर गुरूवारी दुपारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. डॉ. गुंडे यांचे बुधवारी सकाळी केरळमधील कल्पेट जि. वायनाड येथे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.बुधवारी सायंकाळी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने डॉ. गुंडे यांचे पार्थिव कोल्हापूरला आणण्यात आले. पार्थिवासोबत त्यांच्या पत्नी ललिता व कन्या कविता केरळहून कोल्हापुरात आल्या. डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते.

गुरूवारी सकाळी साडे सातच्या सुमारास त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कमधील ‘कृष्णा’ निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी ललिता, कन्या कविता आणि डॉ. सुचेता यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनीही गर्दी केली होती.त्यांचे केरळमधील जावई श्रेयमंसकुमार हे गुरूवारी सकाळी मेंगलोरहून चाटर्र विमानाने कोल्हापुरात आले. यानंतर डॉ.गुंडे यांचे पार्थिव शववाहिकेतून पंचगंगा स्मशानभूमीमध्ये आणण्यात आले. तेथे श्रेयंसकुमार यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

यावेळी त्यांचे दुसरे जावई सलीम लाड यांच्यासह अन्य नातेवाईक उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी सहा वाजता अस्थिविसर्जन करण्यात आले.

तत्पूर्वी सकाळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, अ‍ॅड. के. अ‍े. कापसे, प्रा. बी. ए. चौगुले, डॉ. सुनील पाटील, डॉ. रावसाहेब पाटील, नितीन आडके, डॉ.पी. एम. चौगुले, सुभाष चौगुले, दक्षिण भारत जैन सभेचे प्रा. डी. ए. पाटील, सागर चौगुले, नगरसेवक राहूल चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरYogaयोग