शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आयात शुल्क शंभर टक्के करण्याची ‘इसमा’ची मागणी, साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:54 IST

गेल्या दीड महिन्यात साखरेचे दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी घसरल्याने साखर कारखानदार चांगलेच अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ करून ते १०० टक्के करावे, अशी मागणी खासगी साखर कारखानदारांची शिखर संस्था ‘इसमा’ने केली आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार १५० टक्क्यापर्यंत आयात शुल्काची आकारणी करता येते.

ठळक मुद्दे दीड महिन्यात क्विंटलमागे चारशेंची घसरणसाखरेच्या आयात शुल्कात वाढ करून ते १०० टक्के करावे, अशी मागणी ‘इसमा’ खासगी साखर कारखानदारांची शिखर संस्था

राजाराम लोंढे

कोल्हापूर : गेल्या दीड महिन्यात साखरेचे दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी घसरल्याने साखर कारखानदार चांगलेच अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ करून ते १०० टक्के करावे, अशी मागणी खासगी साखर कारखानदारांची शिखर संस्था ‘इसमा’ने केली आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार १५० टक्क्यापर्यंत आयात शुल्काची आकारणी करता येते.गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन घटल्याने दर ५० रुपयांपर्यंत जातील, याची भीती केंद्र सरकारला असल्याने त्यांनी साखर कारखानदारांसह व्यापाऱ्यांच्या साखर साठ्यावर निर्बंध आणले होते; पण यंदा उसाची उपलब्धता अधिक असल्याने साहजिकच साखरेचेही उत्पादन वाढणार आहे.

याचा अंदाज आल्यानंतर केंद्राने चार दिवसांपूर्वी साठ्यावरील नियंत्रण उठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साखरेचे घसरणारे दर थांबले; पण दरात वाढ होण्याची शक्यता नाही. त्यात यंदा शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ‘एफआरपी’ची रक्कम वाढली आहे. साखरेचे दर घसरल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केले आहे. त्यामुळे ‘एफआरपी’ देताना कारखान्यांची दमछाक होत आहे.अशा परिस्थितीत साखरेची आयात झाली तर दर कोसळतील, अशी भीती कारखान्यांना आहे. यासाठी ‘इसमा’ने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे आयात शुल्कवाढीची मागणी केली आहे.

दक्षिण व पश्चिम भारतात घाऊक बाजारात साखरेचा दर प्रतिक्विंटल ३०५० रुपये, तर उत्तर भारतात ३३५० रुपये राहिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पैसे देणे कारखान्यांना अशक्य झाले असून आयात शुल्क ५० वरून १०० टक्के करण्याची मागणी ‘इसमा’ने केंद्र सरकारकडे केली आहे.

पाकिस्तानमध्ये निर्यात अनुदानपाकिस्तान सरकारने १५ लाख टन साखर निर्यात करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी निर्यात अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर सिंध राज्य सरकारने साखर निर्यातीवर अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर