कोल्हापूर : घराला आग लागून दाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 12:24 IST2017-02-24T12:24:55+5:302017-02-24T12:24:55+5:30

कोल्हापूरमधील कागल येथे कापड दुकानास आणि राहत्या घरास आग लागून दांपत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Kolhapur: Death of a couple after a fire in a house | कोल्हापूर : घराला आग लागून दाम्पत्याचा मृत्यू

कोल्हापूर : घराला आग लागून दाम्पत्याचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि.२४ - कोल्हापूरमधील कागल येथे कापड दुकानास आणि राहत्या घरास आग लागून दांपत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. धनंजय कोळेकर व त्यांची पत्नी आगीत मृत्यूमुखी पडले आहे, मात्र सुदैवाने त्यांची दोन्ही मुले या दुर्घटनेतून बचावली. मध्यरात्री एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 
दरम्यान या घटनेत कापड दुकान, तसेच शेजारील महादेव मडीलगेकर यांचे सायकल दुकान व कृष्णात रानमाळे यांच्या शिलाई मशीन विक्री दुकानातील साहित्य अशी 50 लाख रुपयांची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने कोळेकर दाम्पत्याची दोन मुले रोहित व ज्ञानेश्वरी आजी आजोबांसोबत दुकानात झोपल्यामुळे त्यांचा जीव बचावला. पहाटे 4 वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम चालू होते. बिद्री साखर कारखाना व हमीदवाडा साखर कारखान्याचे अग्निशमन बंब वेळीच दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. 

Web Title: Kolhapur: Death of a couple after a fire in a house