शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील धरणे सुरक्षित, ‘पाटबंधारे’ चार दिवसांत अहवाल देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:18 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटल्यानंतर राज्यातील सर्व धरणांचे आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील बहुतांश धरणांचे आॅडिट पूर्ण झाले असून, सर्व धरणे सुरक्षित आहेत. याबाबतचा अहवाल येत्या चार दिवसांत सरकारला पाठविला जाणार आहे. या आॅडिटशिवाय पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मेमध्ये; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात धरणांची तपासणी केली जाते.

ठळक मुद्देकोल्हापुरातील धरणे सुरक्षित, वर्षातून दोन वेळा आॅडिट‘पाटबंधारे’ चार दिवसांत अहवाल देणार

राजाराम लोंढे

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटल्यानंतर राज्यातील सर्व धरणांचे आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील बहुतांश धरणांचे आॅडिट पूर्ण झाले असून, सर्व धरणे सुरक्षित आहेत. याबाबतचा अहवाल येत्या चार दिवसांत सरकारला पाठविला जाणार आहे. या आॅडिटशिवाय पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मेमध्ये; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात धरणांची तपासणी केली जाते.तिवरे धरण फुटल्यानंतर राज्यातील पाटबंधाऱ्याची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पाटबंधारे विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्यांकडून सर्व धरणांचे आॅडिट करून तत्काळ अहवाल मागविला आहे. कोल्हापुरात ‘वारणा’, ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘तुळशी’ या मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प ४० च्या पुढे आहेत. या धरणांची देखरेख ‘उत्तर’ व ‘दक्षिण’ विभागामार्फत केली जाते. धरणांचे दरवर्षी दोन वेळा आॅडिट केले जाते.

पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मे; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आॅडिट केले जाते. यापैकी एक आॅडिट पाटबंधाऱ्यांचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता; तर दुसऱ्यांदा नाशिक येथील धरण सुरक्षितता संघटनेच्या माध्यमातून केले जाते. या वर्षीही आॅडिट झालेले आहे.

तिवरे धरणफुटीनंतर राज्य सरकारने पुन्हा आॅडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंत्यांनी काम सुरू केले असून सर्व धरणे, बंधारे व तलाव १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल तयार झाला आहे. काही किरकोळ दुरुस्त्या असतील तर त्या स्थानिक पातळीवरच करण्याच्या सूचना दिल्या जातात.‘दूधगंगा’ व ‘वारणा’ धरणांना गळती आहे. याबाबत धरण सुरक्षितता संघटनेला कळविलेले आहे. त्यांनी केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्र, दिल्ली यांच्यामार्फत उपाययोजना सुरू केल्या आहेत. या केंद्रात शास्त्रज्ञ आहेत. ते धरणाला भेट देऊन कशा प्रकारे दुरुस्तीचे काम केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करतात.काळम्मावाडीची गळीत कमी करण्यात यश!काळम्मावाडी धरणाला फार पूर्वीपासून गळती आहे. १९९९ मध्ये प्रतिसेकंद ३८५ लिटर पाणी गळतीतून जात होते. त्यानंतर वेळोवेळी उपाय केल्याने आता केवळ प्रतिसेकंद ८० लिटर पाण्याची गळती राहिली आहे.धरणक्षेत्रांत रोज दोन-तीन भूकंप‘दूधगंगा’, ‘वारणा’, ‘कोयना’ या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरण परिसरांत रोज दोन ते तीन भूकंप होतातच. ३.५ रेक्टरपेक्षा कमी असल्याने ते जाणवत नाहीत. वर्षभरात भूकंपाचे ६०० धक्के होतात. त्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे होते.तलाव, बंधारे अंतर्गत सिंचनक्षेत्रधरणाचा प्रकार              बांधण्याची जबाबदारी         सिंचनक्षेत्र हेक्टरमध्ये

  1. पाझर तलाव                     जिल्हा परिषद                      ० ते १००
  2. लघू पाटबंधारा                 जलसंधारण विभाग             १०० ते २५०
  3. मध्यम प्रकल्प                 पाटबंधारे विभाग                 २५० ते १०००
  4. मोठे प्रकल्प                      पाटबंधारे विभाग               १००० च्या पुढे

 

जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असून वर्षातून दोन वेळा त्यांचे आॅडिट होते. तिवरेच्या घटनेनंतर पुन्हा आॅडिट केले जात असून, त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाईल.- एस. एम. गुरव, उपकार्यकारी अभियंता 

 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर