शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दिनकरला मिळाला हक्काचा निवारा, चंद्रकांतदादांच्या पुढाकाराला अनेक दातृत्वाचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:55 IST

जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.

ठळक मुद्देजीवबा नाना पार्क येथे हक्काच्या घराचे स्वप्न समाजातील अनेक दातृत्वाचे हात नवीन घरात संपर्क कार्यालयनोकरीही कायमची व्हावी

कोल्हापूर : जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. यामागे दिनकरचे कर्तृत्व आणि त्याग आहे. पण गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.समाजात अनेकजण सामाजिक कामे करतात, पण त्यांच्यापेक्षा निश्चितच वेगळे असे काम दिनकर कांबळे करीत आहेत. मदत करायची राहू दे, पण त्या घटनेकडे बघायचेही धाडस होत नाही. अशी कामे करण्यासाठी पदोपदी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या फारच कमी. त्यामध्ये दिनकरचे नाव अव्वल घ्यावे लागेल.

गेली २२ वर्षे अविरतपणे हे काम सुरू आहे. त्यातून आपल्या पदरात काय पडणार, माझ्या कुटुंबाचे काय होणार, हे केल्यानंतर समाज मला काय देणार, हे विचार दिनकरच्या मनाला कधी शिवलेच नाहीत. त्यामुळेच आज एका विशिष्ट उंचीवर त्याचे नाव आहे.

सामाजिक काम करत असताना त्याचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते, कांडगावमध्ये राहते घर आहे. पण कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात एखादी दुर्घटना घडली, तर तेथून येताना वेळ जातो. यासाठी शहरात घराची गरज होती. अनेकांनी घरासह नोकरीची आश्वासने दिली, पण ती कधी हवेत विरली, हे दिनकरलाही कळले नाही.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिनकरला हक्काचा निवारा करून द्यायचा, हा निर्णय घेतला आणि जीवबा नाना पार्क परिसरात ‘वन बीएचके’ घराचे बुकिंगही केले. मंत्री पाटील यांच्या या निर्णयाला समाजातील अनेक दातृत्वाचे हात पुढे येत असल्याने लवकरच दिनकरला हक्काचा निवारा मिळणार आहे.

नोकरीही कायमची व्हावीदिनकर कांबळे सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे. मंत्री पाटील यांनी त्याच्या कायमच्या निवाऱ्यांची सोय केली, त्याप्रमाणे नोकरीही कायम करावी, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

नवीन घरात संपर्क कार्यालयकेवळ राहण्यासाठी नवीन घराचा वापर दिनकर करणार नाही. तिथे संपर्क कार्यालय सुरू केले जाणार असून, तिथे नागरिकांना थेट संपर्क साधता येणार आहे.

 

शहरात राहात नसल्याने दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ पोहोचता येत नाही. ही गरज ओळखून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घर देऊन खूप मोठे काम केले. हे घर नसून नागरिकांसाठी संपर्क कार्यालय राहणार आहे.- दिनकर कांबळे, जीवरक्षक 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHomeघर