कोल्हापूर--'डी. वाय. पाटील अभियांत्रिकी'ला विजेतेपद

By Admin | Updated: August 25, 2014 23:12 IST2014-08-25T23:04:36+5:302014-08-25T23:12:11+5:30

सतेज युथ फेस्ट : आर. एस. गोसावी कलानिकेतन उपविजेते, कोल्हापूर टॅलेंटचा गौरव

Kolhapur - 'D. Y Patil Engineering wins title | कोल्हापूर--'डी. वाय. पाटील अभियांत्रिकी'ला विजेतेपद

कोल्हापूर--'डी. वाय. पाटील अभियांत्रिकी'ला विजेतेपद

कोल्हापूर : सतेज पाटील फौंडेशनतर्फे आयोजित सतेज युथ फेस्टमध्ये तरुणाईच्या कला व बुद्धिकौशल्याला वाव देत अनेक स्पर्धा झाल्या. त्यामध्ये जणू कोल्हापुरी टॅलेंटचाच गौरव झाला. ‘फेस्ट’चे सर्वसाधारण विजेतेपद डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकावून या फेस्टला आणखी तेज केले. तर अर्जितसिंगच्या गायकीने तरुणाईला अक्षरश: घायाळ केले.
गायक अर्जितसिंग याने ‘ मैं क्यूँ करू इंतजार तेरा’ ‘मस्त मदन तेरा नाम, आँखे क्या माँगे हे तेरी मंजुरी’ आणि सरतेशेवटी ‘एक पल कोई लम्हा’, ‘हर सास तेरे बिना’ ही तरुणाईवर राज्य करणारी गाणी सादर करत अक्षरश: तरुणाईला घायाळ केले.
युथ फेस्टचा निकाल असा, फे स्ट सर्वसाधारण विजेतेपद डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने, तर उपविजेतेपद आर. एस. गोसावी कलानिकेतन पटकाविले.
एक्सटेंपोर स्पीच - विजय चौगले (न्यू कॉलेज) प्रथम, राजेश पाटील(शिवाजी विद्यापीठ) द्वितीय. गु्रप डान्स : महावीर महाविद्यालय (प्रथम), टी.के.आय.टी महाविद्यालय, वारणा (द्वितीय). डिबेट - शुभम भुकटे, प्रज्ञा दत्तवाडकर (जे.जे.मगदूम कॉलेज), सुस्मिता कुडे, विजय चौगले(न्यू कॉलेज). स्कल्प्टींग- प्रदीप कुंभार ,प्रथम, ओंकार कोळेकर, द्वितीय (दोघेही इन्स्टिट्यूट आॅफ दळवीज आर्टस्),
कोल्हापूर टॅलेंट हंट : सानिका मुतालिक (मास कम्युनिकेशन, शिवाजी विद्यापीठ), श्रीधर गुरव, शुभम गदरे, अभिषेक कुलकर्णी (डीआरके). रॉक बँड : टी.के.आय.ई.टी , वारणानगर (प्रथम), आर.एस.गोसावी कलानिकेतन (द्वितीय). ग्राफिटी : सागर ढेकणे, अक्षयकुमार पाटील (इन्स्टिट्यूट आॅफ दळवीज आर्ट) प्रथम, अक्षय ढवळे, अविनाश तिबिले (आर.एस.गोसावी कलानिकेतन) द्वितीय . ट्रेझर हंट : संग्राम लाड, जयकुमार माने (बी.मॅट)प्रथम, दिशा पाटील, सारंग वडियार (शासकीय तंत्रनिकेतन) द्वितीय. फेस पेंटिंग : विपुल हर्डेकर (कलानिकेतन महाविद्यालय) प्रथम, मंगेश मोरे (विवेकानंद )
बेस्ट आऊट आॅफ वेस्ट : अपूर्वा शर्मा, पूनम रायकर (कॉलेज आॅफ नॉन कन्व्हेंशनल फॉर वुमेन)प्रथम, शुभम मुळेकर, सुमित रावळ ( आय.टी.आय)
फॅशन शो : डॉ. डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय (प्रथम), आर.एस.गोसावी कलानिकेतन (द्वितीय).युथ आयकॉन : श्रीधर गुरव ( डीआरके कॉमर्स, कोल्हापूर ) लकी ड्रॉ विजेती : लुमना दमानिया, राजारामपुरी. युथ आयकॉन : श्रीधर गुरव (डीआरके कॉलेज आॅफ कॉमर्स, कोल्हापूर ). (प्रतिनिधी)

सतेज पाटील फौंडेशनतर्फे कोल्हापूर येथे ड्रीमलँड वॉटर पार्कमध्ये आयोजित सतेज युथ फेस्टचे सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक डॉ. संजय पाटील व शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी. सोबत वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, करण पाटील, तेजस पाटील आदी.

Web Title: Kolhapur - 'D. Y Patil Engineering wins title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.