शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : खंडणी प्रकरणी तिघांना अटक, योगेश राणेसह ११ जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 19:52 IST

भावाचे कर्ज प्रकरण करावयाचे आहे असे सांगून कळंबा साई मंदिर येथून कारमध्ये जबरदस्तीन घालून पळवून नेऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागून व ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली.

ठळक मुद्दे खंडणी प्रकरणी तिघांना अटक, योगेश राणेसह ११ जणांविरोधात गुन्हा कर्ज प्रकरण करावयाचे सांगून कारमधून पळवून नेऊन मारहाण

कोल्हापूर : भावाचे कर्ज प्रकरण करावयाचे आहे असे सांगून कळंबा साई मंदिर येथून कारमध्ये जबरदस्तीन घालून पळवून नेऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागून व ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली .ही घटना ३० एप्रिल २०१८ ला घडली.या प्रकरणी योगेश राणेसह ११ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.२५ लाख रुपयांच्या खंडणीपैकी ७८ हजार ५०० रुपये संशयितांनी घेतले असून या प्रकरणी ऋषिकेश राजेंद्र फुटाणकर (रा.मालवे कॉलनी,सरवडे,ता.राधानगरी),विशाल बाजीराव पाटील (रा.प्रतिभानगर,मेन रोड ओम गणेश मंगल कार्यालय पाठिमागे) व शेखर दत्तात्रय कलगुटगी ( रा.१३८२ ई वॉर्ड, नवश्या मारुती मंदिरजवळ ,शाहूनगर,कोल्हापूर ) यांना अटक करण्यात आलेली आहे. हे तिघे सध्या पोलिस कोठडीत आहेत.

या गुन्ह्यातील संशयित योगेश बाळासो राणे (रा.शाहूपुरी,कोल्हापूर) ,आकाश आनंदा आगलावे (रा.न्हावयाचीवाडी, शिळोली ,ता.भुदरगड) ,मारुती मधूकर कांबळे (रा. निगवे खालसा, ता.करवीर) यांचाही गुन्हयात असल्याचे निष्पन्न झाले .योगेश राणे व आकाश आगलावे यांनी सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.परंतु,त्यांचा जामीन अर्ज फेटाळ्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले की,निगवे खालसा (ता.करवीर) येथील विजय निवृत्ती कांबळे हे बँकेच्या कर्ज प्रकरणांची कागदपत्र पुर्तता करुन देण्याचे काम करतात. कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर त्यामधील कमिशन ते घेतात. कांबळे याना अज्ञात इसमाने त्यांच्या मोबाईल फोन करुन ‘आपल्या भावाचे कर्ज प्रकरण ’करावयाचे आहे असे सांगून ३० एप्रिलला साई मंदिर येथे बोलवून घेतले.

तेव्हा विजय कांबळे हे त्याठिकाणी आले असता, सहा संशयित आरोपींनी त्यांना कारमध्ये जबरदस्तीमध्ये बसवून पळवून नेले.त्यानंतर त्याना ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईपने मारहाण करुन २५ लाख रुपयांची खंडणी मागितली.त्यापैकी संशयितांनी ७८ हजार ५०० रुपये घेतले व सोडून दिले.घटनेपासून संशयित पसार झाले होते.याचा तपास पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे यांनी केला असता ऋ़षिकेश फुटाणकर यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असताना संशयित विशाल पाटील व प्रसाद सुरेश घाटगे (वय २८ ,रा.१३४२ ई वॉर्ड,दत्त गल्ली शाहूनगर) हे दोघे साथीदार असल्याचे निष्पन्न झाले.त्यापैकी विशाल व शेखर या दोघांना पोलिसांनी अटक केली.फुटाणकरची पोलिस कोठडीची मुदत  शुक्रवारी संपणार आहे . विशाल पाटील, व शेखर कलगुटगी या दोघांना न्यायालयाने रविवारी (दि.१९) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर