शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कोल्हापूर : मराठा महासंघातर्फे बुधवारी राज्याभिषेक मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 16:29 IST

३४५ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त  बुधवारी दुपारी साडेचार वाजता शहरात राज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टसह विविध धर्मिय, समाजबांधवांतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.

ठळक मुद्देमराठा महासंघातर्फे बुधवारी राज्याभिषेक मिरवणूकपारंपरिक वाद्ये, मर्दानी खेळांचा समावेश; शिवप्रेमी होणार सहभागी

कोल्हापूर : ३४५ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त  बुधवारी दुपारी साडेचार वाजता शहरात राज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टसह विविध धर्मिय, समाजबांधवांतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा, विविध वेशभूषेतील मावळे, मर्दानी खेळांच्या कसरती, वारकरी पथक, झांजपथक, धनगरी ढोलपथक, सामाजिक कार्याची माहिती देणारा स्क्रीन, प्रबोधनात्मक फलक असणार आहेत. भगवी साडी परिधान करून महिला सहभागी होणार आहेत.

मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीची सुरुवात होईल. शाहू बँक, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी ते छत्रपती शिवाजी चौक येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे.

गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने शिस्तबद्ध, डॉल्बीमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने हा मिरवणुकीचा सोहळा साजरा होत आहे. यावर्षी खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, शासकीय अधिकारी, नगरसेवक, शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

जनतेचा लोकोत्सव भव्यतेने साजरा करण्यासाठी शिवप्रेमी बंधू-भगिनींनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुळीक यांनी केले आहे.

वारकरी बंधूंनी आवाहनछत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या स्वधर्म व स्वराज्याच्या संकल्पनेला उजाळा देण्यासाठी शक्ती आणि भक्तीच्या संगमाचे प्रतिबिंब दाखविण्यासाठी या मिरवणुकीत वारकरी बंधूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुळीक यांनी केले. 

 

टॅग्स :Raigadरायगडkolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज