शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय केले रिकामे, दफ्तर हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 14:29 IST

कर्मचाऱ्यांकडून साहित्याची आवराआवर

कोल्हापूर : गुरूवारी सकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर तसेच मागील दोन महापुरांचा अनुभव गाठीशी घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरील सर्व विभागांमधील दफ्तर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुराचे पाणी येणाऱ्या सर्व विभागांनी महत्त्वाच्या कागदपत्रांची बांधाबांध सुरू केली. सायंकाळी सर्व दफ्तर कपाटांच्या वर तसेच वरच्या मजल्यावरील कार्यालयांमध्ये ठेवण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर चार ते पाच फूट पुराचे पाणी येते. जिल्हाधिकारी बसतात त्यामागील इमारतीत दोन फुटांवर पाणी येते. मुख्य धोका हा समोरच्या जुन्या इमारतीला असतो. येथे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे दालन, राजशिष्टाचार, गावठाण, जमीन, गृह, आस्थापना, वन असे वेगवेगळे विभाग आहेत. नव्या इमारतीत खालच्या मजल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासह नगरपालिका, ग्रामपंचायत, महसूल, भूसंपादन, मुख्यमंत्री सचिवालय, करमणूक, जिल्हा खनिकर्म असे विभाग आहेत.मागील पुराच्या काळात काही दफ्तर पाण्याने भिजून खराब झाले होते. तो अनुभव गाठीशी असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी आधीच सर्व विभागांना दफ्तर, संगणकासह सर्व साहित्याची बांधाबांध करून ते सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सांगितले आहे. त्यामुळे गुरूवारी सकाळी राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडल्याचे कळताच या सर्व विभागांनी दफ्तर बांधून सुरक्षित ठिकाणी हलवले. नव्या इमारतीत दोन ते तीन फूट पाणी येते. त्यामुळे येथील विभागांनी त्यांचे दफ्तर टेबलांवर तसेच कपाटांवर ठेवले आहे.पाणी तातडीने निचरा होण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अंतर्गत रस्त्याचे वारंवार डांबरीकरण झाल्याने तो कार्यालयाच्या पायरीच्या बरोबरीने आला होता. त्यामुळे पुराचे पाणी लगेच कार्यालयात शिरायचे. मात्र वर्षभरापूर्वी हा भराव काढून रस्ता चार फुटांनी खाली केला आहे. रस्ता पायऱ्यांच्या खाली गेला आहे, शिवाय पाणी तातडीने निचरा होण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा उपयोग यंदाच्या पुरात होतो का हे बघावे लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरcollectorजिल्हाधिकारी