शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:33 AM

महापुराच्या काळात जिल्हा परिषदेत स्थलांतरित झालेले जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा मूळ जागेत गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाले; परंतु सोमवारी खऱ्या अर्थाने हे कार्यालय गजबजल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा गजबजलेतीन दिवसांपासून पूर्ववत कामकाज सुरू

कोल्हापूर : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेत स्थलांतरित झालेले जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा मूळ जागेत गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाले; परंतु सोमवारी खऱ्या अर्थाने हे कार्यालय गजबजल्याचे चित्र होते.महापुराच्या काळात पाणी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनासह जमीन विभाग, आस्थापना विभाग, गृह विभाग, ग्रामपंचायत विभाग, आदी कार्यालयांमध्ये पाणी पाणी झाले होते; त्यामुळे मंगळवारी (दि. ६) दुपारनंतर कार्यालयांमधील महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, फोन अशा यंत्रणा काढून त्या दुुसºया मजल्यावर ठेवण्यात आल्या.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा परिषदेत तळ हलविला होता. तेथूनच महापुरावर नियंत्रणाचे काम सुरू होते. पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. तसेच सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांनीही या ठिकाणी येऊन परिसर चकाचक केला.

या ठिकाणी तीन दिवसांपासून पूर्ववत कामकाज सुरू झाले; परंतु काही कार्यालयांमध्ये स्वच्छता सुरू असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही काळ एका कार्यालयातून कामकाज केले. सोमवारी खऱ्या अर्थाने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच गजबजल्याचे दिसले. प्रत्येक कार्यालयात पूर्वीप्रमाणेच लगबग सुरू होती. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीKolhapur Floodकोल्हापूर पूर