शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देव आम्हा एकच ठावे, घाम गाळुनी काम करावे; कष्टकऱ्यांचा गणेशोत्सव रस्त्यावरच 

By पोपट केशव पवार | Updated: September 23, 2023 14:00 IST

व्यवसायातून बांधली श्रमाची पूजा

पोपट पवारकोल्हापूर : 'ते' सगळेच छोट्या-मोठ्या व्यवसायातून कुटुंबाचा गाडा चालविणारे, प्रत्येकाची सकाळ पहाटे पाचपासून सुरू होणारी. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सण-समारंभ, उत्सव त्यांच्या गावाही नाही. उभे कोल्हापूर शहर सध्या गणेशोत्सवात न्हाऊन निघाले असताना कष्टकरी, कामगार मात्र बाप्पाच्या रुपात श्रमाची पूजा बांधण्यातच गुंतला आहे.

कुणाचा चहाचा गाडा तर कुणाची फळाची गाडी, फुले विकून आयुष्य सुगंधी करणारे असोत की भाजीविक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे, हा कष्टकरीवर्ग गणेशोत्सव काळातही पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावरच्या व्यवसायातून या आनंदात सामील झाला. घरात गणपती असताना आम्हाला उदरनिर्वाहासाठी दिवसभर बाहेर व्यवसाय करावा लागत असला तरीही व्यवसायाने दिलेली रोजी-रोटीच आमच्यासाठी दैवत्व आहे. त्यामुळे 'देव आम्हा एकच ठावे, घाम गाळुनी काम करावे' अशी भावना कष्टकरी-कामगारांतून व्यक्त झाली.

गणपतीच्या काळात कॉलनीतील सर्वच महिला एकत्र येतात. पण ते भाग्य आमच्या वाट्याला नाही. गेल्या २५ वर्षापासून फुले विक्रीचा व्यवसाय करते. घरात गणपती आणला असला तरी व्यवसाय बंद कसा करायचा. या व्यवसायानेच कुटुंबाला सावरले आहे. त्यामुळे हा व्यवसायच आमच्यासाठी दैवत्व आहे. नंदा कांबळे, फुलविक्रेत्या. लक्ष्मीपुरी भाजी मंडई, (प्रयाग चिखली, ता. करवीर) 

गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. पण अडचणीच्या काळात या व्यवसायानेच तारले आहे. गणपतीच्या काळात घरी थांबता येत नसल्याचे वाईट वाटते, पण, कुटुंबाची प्रगती साधायची असेल तर व्यवसायाला पहिले प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही या व्यवसायाच्या रुपातच बाप्पाला पाहतो. पूजा दिलीप सकटे, भाजीविक्रेत्या, लक्ष्मीपुरी भाजी मंडई. (गडमुडशिंगी, ता. करवीर)

घरात गणपती आणला आहे. पण, दिवसभर चहाच्या स्टॉलवर असते. संध्याकाळी गेल्यानंतरच पूजाअर्चा करते. ३५ वर्षापासून चहाचा स्टॉल आहे. त्यात खंड पडू दिला नाही. या व्यवसायामुळे सण, समारंभात जाता येत नाही. पण या स्टॉलमुळेच कुटुंब सावरले ते कसे विसरायचे. - छाया जयवंत मोरे, चहाविक्रेत्या, नाना पाटीलनगर.

पहाटे पाच वाजल्यापासून रस्त्यावरभाजीविक्री करणाऱ्या महिलांना पहाटे पाच वाजताच लिलावावेळी मार्केट यार्डात जाऊन भाजी खरेदी करावी लागते. ऊन-वारा-पाऊस काहीही असले तरी हा नियम चुकत नाही. घरात गणपती बसवला असला तरी व्यवसाय बंद करणे परवडणारे नाही, त्यामुळे या रुपानेच आम्ही देव पाहतो, अशी भावना राधाबाई भिसुरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव