हगणदारीमुक्तीमध्ये कोल्हापूर शहराची पुन्हा बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:55+5:302021-01-23T04:25:55+5:30
कोल्हापूर : शहर हगणदारीमुक्त अभियानात कोल्हापूर शहराने पुन्हा बाजी मारली आहे. केेंद्र शासनाच्या फेरतपासणीत महापालिकेला ओडीएफ प्लस, प्लसचे प्रमाणपत्र ...

हगणदारीमुक्तीमध्ये कोल्हापूर शहराची पुन्हा बाजी
कोल्हापूर : शहर हगणदारीमुक्त अभियानात कोल्हापूर शहराने पुन्हा बाजी मारली आहे. केेंद्र शासनाच्या फेरतपासणीत महापालिकेला ओडीएफ प्लस, प्लसचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
महापालिकेने खासगी तसेच सार्वजनिक शौचालयांची केलेली उभारणी आणि शहरातील मैल्यावर होत असलेली प्रक्रिया, यावरून हे प्रमाणपत्र मिळाले असून हगणदारीमुक्त शहर अशी शासनपातळीवर नोंद कायम राहिली आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत हगणदारीमुक्त शहर मोहीम राबवली जात आहे. १०० टक्के शौचालय आणि शहरातील मैल्यावर प्रक्रिया करणाऱ्या शहरांना हगणदारीमुक्त शहर घोषित करून ओडीएफ प्लस, प्लसचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते. सामाजिक संघटना आणि कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात खासगी तसेच सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून शहर हगणदारीमुक्त म्हणून यापूर्वीच घोषित झाले आहे. दर सहा महिन्यांनी शहरात यासंदर्भात केंद्र शासनाकडून फेरतपासणी केली जाते. नुकतीच ही फेरतपासणी केली असून यामध्ये कोल्हापूर शहराला ओडीएफ प्लस, प्लस प्रमाणपत्र मिळाले. शहरात सार्वजनिक शौचालये ८६, सर्वोत्तम शौचालये २२ आहेत. कसबा बावडा येथील ७६ एमएलडी आणि दुधाळी येथील १७ एमएलडी अशी दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे जमेची बाजू ठरली आहेत.