शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  ‘झीप क्वॉईन’च्या मुख्य सूत्रधारास कोठडी, पंधरा गुंतवणूकदारांच्या तक्रारी : दोन बुलेट, मोबाईल, संगणक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 11:05 IST

झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यांतील गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधारास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दि. १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ठळक मुद्दे‘झीप क्वॉईन’च्या मुख्य सूत्रधारास कोठडीपंधरा गुंतवणूकदारांच्या तक्रारी दोन बुलेट, मोबाईल, संगणक जप्त

कोल्हापूर : झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यांतील गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधारास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दि. १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

संशयित बालासाहेब ऊर्फ बालाजी भरत गणगे (वय ३८, रा. पुणे) असे त्याचे नाव आहे. संशयितांकडून दोन बुलेट, सात मोबाईल, तीन संगणक, दोन लॅपटॉप, आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, सायबरतज्ज्ञांच्या सहकार्याने अभ्यासपूर्वक तपास सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेडे यांनी दिली.दरम्यान, संशयित बालाजी गणगे, राजेंद्र नेर्लेकर, त्याचा भाऊ अनिल, संजय कुंभार या चौघांनी भागीदारीमध्ये सप्टेंबर २०१७ पासून ‘झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सी’ ही डिजिटल कंपनी सुरू करून महिन्याला पंधरा टक्के लाभांश बीट क्वॉईनच्या रूपात देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रासह कर्नाटकातील गुंतवणूकदारांकडून दहा हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत पैसे घेतले.

या पैशांतून त्यांनी काही गुंतवणूकदारांना बुलेट आणि प्रत्येकी तीन तोळे सोने बक्षीस म्हणून दिले. त्यांतील दोन बुलेट, सात मोबाईल, तीन संगणक, दोन लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले. नेर्लेकर आणि कुंभार यांच्या दोन आलिशान कारही या गुन्ह्यात जप्त केल्या जाणार आहेत. या चौघांनी अपहारातील रकमेतून काय खरेदी केली आहे, कोणाच्या नावे रक्कम गुंतविली आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत.

काही साक्षीदारांकडेही चौकशी सुरू आहे. जमीन, रिकामे प्लॉट, फ्लॅटसह काही व्यवसायांमध्ये पैसे गुंतविल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. संपूर्ण तपास हा कागदोपत्री असल्याने सायबर विभाग, स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखा असा संयुक्तपणे आहे. दिवसेंदिवस या गुन्ह्याची व्याप्ती वाढत आहे. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाPoliceपोलिस