शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

कोल्हापूर : छोटा भीम, मोटू-पतलूची ‘क्रेझ’ कायम, आकर्षक स्कूल बॅगांनी रंगल्या बाजारपेठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:41 IST

गेल्या आठवड्यापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी मराठी माध्यमातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देछोटा भीम, मोटू-पतलूची ‘क्रेझ’ कायमआकर्षक स्कूल बॅगांनी रंगल्या बाजारपेठा

कोल्हापूर : गेल्या आठवड्यापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी मराठी माध्यमातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे.

दरवर्षी पालकांना नवीन स्कूल बॅग घेण्याशिवाय पर्याय नसल्याने स्कूल बॅग खरेदीसाठी पालकांनी मोठी गर्दी केली आहे. यंदाही स्कूल बॅगमध्ये छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमनची क्रेझ कायम राहिली आहे.शाळेत जायचे म्हटले की प्रथम खरेदी सुरू होते ती शाळेच्या दप्तराने. दप्तराचे आता नामांतर होऊन ‘स्कू ल बॅग’ हे नाव प्रचलित झाले आहे. स्पर्धेच्या युगात वह्या, पुस्तकांनी स्कूल बॅग नेहमीच भरलेली असते. त्यामुळे दरवर्षी ती नवीन घेतल्याशिवाय पर्याय नाही.

शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिल्याने शालेय साहित्यापैकी महत्त्वाची खरेदी म्हणजे स्कूल बॅग होय. ही बॅग खरेदीसाठी बाजारपेठेत पालकांची व विद्यार्थ्यांची झालेली गर्दी.(छाया : नसीर अत्तार)

शहरासह- उपनगरांतील दुकाने नव्या कलरफुल बॅगेने फुलली आहेत. कार्टून चॅनेलवरील कार्टूनमधील एखादे पात्र मुलांच्या आवडीचे असते. अशा कार्टूनमधील पात्रांची चित्रे असलेल्या स्कूल बॅगला मागणी वाढत आहे.गतवर्षीपेक्षा साधारणपणे १० ते १५ टक्के स्कूल बॅगच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसते. यंदा स्कूल बॅगचे दर साधारणपणे १२५ रुपयांपासून १४०० रुपयांपर्यंत आहेत तसेच काही दुकानदार ग्राहकांच्या मागणीनुसार स्कूल बॅग शिऊनही देतात.

यांची क्रेझ...छोटा भीम, मोटू-पतलू, पोकेमॉन, स्पायडर मॅन, मिकी माऊस, अँग्री बर्ड, बार्बी डॉल, डोनाल्ड डक आणि बॅटमॅन अशा विविध कार्टून्स स्कूलबॅगसह विविध संदेश असलेल्या कलरफुल स्कूल बॅगेला मागणी आहे; पण, त्यासोबत ‘थ्रीडी’ चित्र असलेल्या दप्तरांना मागणी वाढली आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा स्कूल बॅग दरामध्ये जीएसटीमुळे दरामध्ये जरा फरक दिसत आहे तरी साधारणपणे १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. मुलांना कार्टूनची चित्र असलेल्या बॅगला मागणी आहे.सुनीता साळवी, स्कूल बॅग विक्रेते 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाeducationशैक्षणिक